ST Bus | (Photo Credits: MSRTC)

अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काही दिवसांपूर्वी मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी एसटीचा प्रवास आता हाफ तिकीटात होणार असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान ही घोषणा लक्षात ठेवून एक प्रवासी एसटी वाहकासोबत हुज्जत घालत असल्याचा एक व्हिडिओ सध्या वायरल होत आहे. दरम्यान अर्थसंकल्पात झालेल्या घोषणांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांना त्याचा जी आर मिळणं आवश्यक असतो. पण त्याची कल्पना नसलेली एक महिला तिकीटासाठी कंडक्टर सोबत हुज्जत घालत होती.

दत्तापूर ते लातूर एसटी बस मधील ही घटना आहे. सविता पोपट कामखेडा येथे चढल्या आणि त्या लातूर कडे प्रवास करत होत्या. कंडक्टरने जेव्हा तिकीटाचे पैसे विचारले तेव्हा त्यांनी दिलेल्या पैशात हाफ तिकीट दे असे सांगितलं. त्यावर हाफ तिकीट का असा सवाल कंडक्टरने विचारल्यानंतर त्या फडणवीस यांच्या घोषणेचा दाखला देत कंडक्टर सोबत हुज्जत घालू लागल्या. आता कार्डची देखील गरज नसल्याचं त्या सांगत होत्या. दरम्यान कंडक्टर आणि सहप्रवासी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करत होते पण त्या महिला काहीच ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हत्या. नक्की वाचा: Maharashtra Budget 2023: 'लेक लाडकी' योजना ते आशा स्वयंसेविकाच्या मानधनात वाढ; पहा महिलांसाठी केलेल्या महत्त्वाच्या घोषणा.

पहा वायरल व्हिडिओ

लातूरच्या फुलाबाई बनसोडे हॉस्पिटल जवळ बस आल्यानंतर बसच्या पाठीमागून गोटू माने आणि त्यासोबत एका अनोळखी व्यक्तीने त्यांची दुचाकी बसच्या समोर आडवी लावली. मग चालकानेही बस थांबवली. त्यांनी बस मध्ये चढून वाहकाला मारहाण, जीवे मारण्याची धमकी आणि शिवीगाळ केली. दरम्यान शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.