Ladies Special Train (Photo Credit: PTI)

कोरोनाच्या संकटकाळात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे, अशी माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई आणि उपनगरांमध्ये प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पश्चिम रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या 28 सप्टेंबरपासून चर्चगेट ते विरार दरम्यान 2 महिला विशेष लोकल (Ladies Special Train) धावणार आहेत. विरारकडून चर्चगेटसाठी सकाळी 7.35 ची लोकल रवाना होणार आहे. तर, संध्याकाळी 6.10 वाजता चर्चगेट ते विरार लोकल चालवण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेच्या या निर्णयामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, कोरोना प्रादुर्भाव वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ट्रेन्समध्ये सोशल डिस्टन्सिंग पालन करणे अधिक गरजेचे आहे. सध्या गर्दी होत असल्याने विशेष लोकलच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर दररोज अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या ज्या महिला काम करतात त्यांच्यासाठी नव्या दोन लेडिज स्पेशल ट्रेन्स सुरु करण्यात आल्या आहेत. हे देखील वाचा- Mumbai Local Updates: मुंबई लोकलच्या मध्य रेल्वे मार्गावरील ट्रेन्समध्ये गर्दी टाळण्यासाठी आजपासून 68 अधिक फेर्‍या वाढवल्या; सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन

ट्विट-

सोशल मीडियावर दोन दिवसांपूर्वी पश्चिम रेल्वेतून प्रवासाचे दोन व्हिडिओ व्हायरल झाले होते. या व्हिडिओत सोशल डिस्टंसिंगच्या नियमाचा फज्जा उडाला होता. या व्हिडिओ संदर्भात पश्चिम रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने आपली प्रतिक्रिया दिली होती. तसेच पावसामुळे रेल्वेमध्ये प्रवाशांची अधिक गर्दी जमली होती, अशी माहिती त्यांनी दिली होती.