Kurla Building Collapse: स्थानिक आमदार मंगेश कुडाळर यांची गुवाहाटीत 'पंचतारांकीत' मज्जा; नागरिकांच्या मदतीसाठी आदित्य ठाकरे मध्यरात्रीही सज्ज
Aditya Thackeray | (Photo Credit - Twitter)

मुंबईतील कुर्ला पश्चिम परिसरात असलेल्या नाईक नगर येथे इमारत कोसळून (Kurla Building Collapse) तिघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. इमारत कोसळ्याचे समजताच मुंबई महापालिका (BMC), मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मदत आणि बचाव कार्यास सुरुवात झाली. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देखील स्थानिकांची विचारपूस करण्यास घटनास्थळी मध्यरात्री 2 वाजता दाखल झाले. स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar) हे मात्र घटना घडून काही तास उलटले तरीही घटनास्थळी पोहोचू शकले नाहीत. त्यामुळे नागरिक अडचणीत असताना आमदार कुडळकर नेमके आहेत तरी कोठे? अशी कुजबूज सुरु झाली आहे.

आमदार मंगेश कुडाळकर हे शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबतच्या गटामध्ये सामील आहेत. गेले आठवडाभर ते गुवाहाटी येथील पंचतारांकीत हॉटेलमध्ये सुखसोई अनुभवत आहेत. तेथे त्यांची मज्जा सुरु आहे. मतदारसंघात दुर्घटना घडली असतानाही त्यांचे प्राधान्य पंचतारांकीत सोई-सुविधा अनुभवन्यास असल्याची भावना मतदारसंघातून व्यक्त होऊ लागली आहे. (हेही वाचा, Kurla Building Collapse: नाईक नगर भागातील इमारत कोसळल्याच्या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढून 3 वर; बचावकार्य अजूनही सुरू)

आमदार कुडाळकरांकडून गुवाहाटी येथून मदत जाहीर

दरम्यान, कुर्ला येथील दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत आमदार कुडाळकर यांनी जाहीर केली आहे. कुडाळकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार ही मदत केली. मात्री त्यांनी ही मदतही पंचतारांकीत हॉटेलमधूनच जाहीर केल्याची चर्चा आहे.

ट्विट

मदत आणि बचाव कार्य सुरु

कुर्ला पश्चिम येथील नाईक नगर भागातील इमारत मध्यरात्री कोसळली. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर काही जण जखमी झाले आहेत. जखमींना मुंबई येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचा सुरु असल्याचे मुंबई महापालिकेने म्हटले आहे. तर, मदत आणि बचावकार्य अद्यापही सुरुच असल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.

ट्विट

स्थानिकांच्या मदतिला धावले आदित्य ठाकरे

मुंबईचे पालकमंत्री असलेल्या आदित्य ठाकरे यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आडावा घेतला. संबंधित अधिकारी आणि यंत्रणेशी संवाद साधून मदत आणि बचाव कार्यासोबतच इतरही काही गरज भासल्यास योग्य ती पावले तातडीने टाकण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान, ज्या इमारतींना मुंबई महापालिकेने नोटीसा दिल्या आहेत त्या इमारती रहिवाशांनी तातडीने खाली कराव्यात असेही आदित्य ठाकरे म्हणाले. नागरिकांनी महापालिकेची नोटीस स्वीकारुन इमारती तातडीन खाली केल्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती पावले प्रशासनाला टाकता येतील असेही आदित्य ठाकरे म्हणाले.