(संग्रहीत आणि संपादित प्रतिमा)

भीमा कोरेगाव प्रकरणी (Koregaon Bhima Cases ) एल्गार परिषदसंदर्भातील पुढील तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा (National Investigation Agency) करणार आहे. याबाबत केंद्रीय गृहखात्याने राज्य सरकारला कळवले आहे. राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कोरेगाव भीमा प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते. मात्र, याआधीच याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवला आहे. यामुळे राज्य सरकार (State Government) आणि केंद्र सरकार (Central Government) असे वातावरण निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत आहेत. हे प्रकरण एनआयएकडे वर्ग होताच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरु झाली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही टीका केली आहे.

कोरेगाव भीमा प्रकरणाची चौकशी एसआयटी. मार्फत करावी, अशी मागणी करणारे पत्र शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. परंतु आता केंद्र सरकारने एल्गार परिषदेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयकडे देऊन एक प्रकारे राज्य सरकारवर कुरघोडी केली आहे. कोरेगाव भीमा येथे 2 वर्षापूर्वी झालेल्या दंगली प्रकरणी झालेल्या तपासावर शरद पवार यांनी संशय व्यक्त केला होता. बुद्धीजीवी लोकांना मुद्दाम या प्रकरणात गोवण्यात आल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. आता केंद्र सरकारने हा तपास स्वत: हून एनआयएकडे सोपावला आहे. यामुळे राज्य सरकार विरूद्ध केंद्र सरकार असे वातावरत निर्माण झाले आहे. हे देखील वाचा- फोन टॅपिंग प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे सरकारवर पलटवार; ' माझ्या कॅबिनेट मध्ये शिवसेना मंत्र्यांचाही सहभाग होता, चौकशीला घाबरत नसल्याचा दावा'

एनआयए ही भाजपाची नव्हे तर, स्वतंत्र संस्था आहे. वास्तव बाहेर आले पाहिजे, प्रकाश आंबेडकर कशाला घाबरतात असे विनोद तावडे म्हणाले. राष्ट्रवादीचे दुसरे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा केंद्राच्या निर्णयावर टीका केली आहे. हा थेट राज्य सरकारच्या कारभारात हस्तक्षेप असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

1 जानेवारी 2018 रोजी भीमा कोरेगाव येथे 200 विजयी दिवस साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येने दलित बांधव एकत्रित जमले होते. काही समाज कंटकांकडून भीमा कोरेगाव येथे मेळावा उधळण्याचा प्रयत्न झाला त्याचे रुपांतर दंगलीत झाले. या दंगलीचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटले होते.