सीएम उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस (फोटो क्रेडिट- PTI)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांच्या पर्श्वभूमीवर तत्कालीन सरकारने राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह काही महत्त्वाच्या व्यक्तींचे फोन टॅप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावर प्रत्युत्तर देताना राजकीय विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्र राज्याची संस्कृती नाही तसेच सरकारने त्यासंबंधी कोणतेही आदेश दिलेले नाहीत असे म्हणत माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आरोपांचे खंडन केले आहे. यासोबतच राज्य सरकार फोन टॅपिंग प्रकरणी कोणत्याही यंत्रणेद्वारा चौकशी करू शकते. असे म्हणाले आहेत.

फोन टॅप करण्यासारखी राजकीय संस्कृती महाराष्ट्रात नाही त्याचे आदेश देण्यात आले नव्हते. तसेच मागील सरकारमध्ये गृहराज्य मंत्री म्हणून भाजपासोबतच शिवसेनेचेदेखील मंत्री होते अशी आठवण त्यांनी आरोप करणार्‍यांना करून दिली आहे.

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

फोन टॅपिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे.' माझं बोलणं कुणाला ऐकायचं असेल तर, त्याचं स्वागत करतो. मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिष्य आहे. कोणतीही गोष्ट लपूनछपून करत नाही. माझं बोलणं ऐका, असं मी म्हणालो होते, अशाप्रकारचे ट्वीट त्यांनी केले आहे. संजय राऊत यांनी फोन टॅप होत असल्याची माहिती भाजपा नेत्यानेच दिली असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजकीय विश्वातही खळबळ पसरली आहे.