Kolhapur Municipal Corporation's Elections 2021: वेगळं लढू, स्वबळ आजमावू आणि मग सत्तेसाठी एकत्र येऊ; कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाची रणनिती
Congress | (File Image)

कोल्हापूर महापालिका निवडणूक 2021 (Kolhapur Municipal Election 2021) संदर्भात काँग्रेस (Congress) पक्षाने आपली रणनिती निश्चित केल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री, काँग्रेस नेते सतेज उर्फ बंटी पाटील (Satej Patil) यांनी याबाबत काही सूचक वक्तव्ये केली. कोल्हापूर येथील शाहूपुरी परिसरातील एका संस्थेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी बोलताना ते म्हणाले कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाची चांगली ताकद आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस स्वतंत्रपणे लढेल. त्यानंतर सत्ता स्थापणेसाठी काँग्रेस महाविकासआघाडीसोबत एकत्र येईल.

राज्यभरात पार पडत असलेल्या आणि पडणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महाविकासआघाडी काय भूमिका घेणार याबाबत ठोस निश्चिती नाही. त्यातच शिवसेना पक्षाकडून काँग्रेस पक्षावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला जात आहे. अशा वेळी काँग्रेस काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतही काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची चिन्हे दिसतआहे. या पर्श्वभूमीवर सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या विधानामुळे त्याला बळकटी मिळाली आहे. (हेही वाचा, Kolhapur Municipal Election 2021: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; अनेकांचा वाजला राजकीय बँड)

काय म्हणाले सतेज पाटील?

कोल्हापूरमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद चांगली आहे. त्यामुळे या ठिकाणी पक्ष स्वतंत्र लढेन. या निवडणुकीत काँग्रेस नक्की चांगला विजय मिळवेल. त्यानंतर महाविकासआघाडी कोल्हापूर महापालिकेत सत्तेत येईल. यासोबतच ग्रामिण भागातही काँग्रेस पक्षाची ताकद. गट-तट आणि स्थानिक आघाड्या यांचा विचार करुन निवडणूक लढवली जाईल. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील. ते आपापले गड राखतील. परंतू, या सर्वांमध्ये काँग्रेस पक्ष सर्वात चांगली कामगिरी करुन सरस ठरेन.