Kokan Weather Prediction, July 24: कोकणात आज अती मुसळधार पावसास इशारा देण्यात आला आहे. व सोबतच हवामान खात्याने आज कोकणात रेड अलर्ट जारी केला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. शनिवार मध्यरात्रीपासून पावसाचा आणखी जोर वाढल्याने लांजा तालुक्यातील मुचकुंदी, राजापूरमधील काजळी नदी, चिपळूणमधील वाशिष्टी नदी, खेडमधील जगबुडी नदी आणि संगमेश्वरमधील शास्त्री या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर शहर आणि रत्नागिरीतील चांदेराई बाजार पेठेत पाणी भरल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. व आज सकाळ पासून रत्नागिरीत पुन्हा मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे जगबुडी नदी परत एकदा धोक्याच्या पातळी वर व्हावेल. राजापुर बाजार परिसरात चारवेळा पाणी भरल्याने येथील आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. तर लांजा येथे कोसळणाऱ्या पावसामुळे मुचकुंदी नदीला पूर आल्याने या पुराचे पाणी चांदेराईच्या बाजारपेठेत शिरले. यामुळे जवळपासच्या गावांचा संपर्क तुटला आहे. आता कोकणात उद्याचे वातावरण कसे असतील यासाठी हवामान खात्याने कोकणात उद्याचा हवामान अंदाज लावला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast for Tomorrow:पुयात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज!
कोकणात उद्याचे हवामान कसे?
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या पावसापासून दिलासा मिळणार नाही. कारण 25 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे