Pune Weather Prediction, July 24: आज पुण्यात ढगाळ वातावरणस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. पुण्यात आज 23 जुलै 2024 रोजी तापमान 24.51 डिग्री सेल्सियस आहे. दिवसाचा अंदाज किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे 23.01 °C आणि 24.85 °C दर्शवतो.पुण्यात उद्या ही ढगाळ वातावरणस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे त्यांच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाल्याने पुणेकरांची पाण्याची समस्या बऱ्यापैकी कमी झाली आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी तीन धरणांची पाणीपातळी गेल्या वर्षीपेक्षा जास्त आहे, तर एका धरणाची पाणीपातळी कमी आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) पुढे येणाऱ्या काही दिवसात चांगल्या पावसाचा अंदाज पुण्यात वर्तवला आहे ज्यामुळे पाण्याची पातळी आणखी सुधारण्यास मदत होईल.राज्यात सध्या ठिकठिकाणी जोरदार पाऊस (Heavy Rain) पडत आहे. या पावसामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसात पुण्यात परत पाऊस जोरदार हजेरी लावेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता पुण्यात उद्याचे हवामान कसे असतील यासाठी हवामान खात्याने पुण्यात उद्याचा हवामान अंदाज लावला आहे.हेही वाचा: Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा रद्द
पुयात उद्याचे हवामान कसे?
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या पावसापासून दिलासा मिळणार नाही. कारण 25 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे