Kolhapur Rain: कोल्हापूर जिल्ह्यात काल पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. आजही देखील संपुर्ण जिल्ह्यात पावासाची बॅटींग सुरु आहे. जिल्ह्यातले ८५ बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर- गगनबावडा सह एकूण ३३ मार्ग बंद करण्यात आले आहे. जिल्ह्यात पावसाचे रौद्ररुप पाहून आज शिवाजी विद्यापीठाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. राधानगरी धरणात ८० टक्के पाणी भरले तर वारणा ७२ टक्के पाणी भरले आहे. हवामान विभागाकडून आज कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहुवाडीत सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.  (हेही वाचा- नागपुरात अतिवृष्टीबाबत IMD अलर्ट, जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये आज बंद, आदेश जारी)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)