शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी INS विक्रांत नंतर किरीट सोमय्या यांच्यावर शौचालय घोटाळ्याचा (Kirit Somaiya On Toilet Scam) आरोप गेला आहे. या आरोपानतर किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी तातडीने खुलासा करत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे प्रशासनाकडून या आरोपांबाबत कोणत्याही प्रकारे चौकशी करण्यापूर्वीच सोमय्या यांनी आपली बाजू मांडत स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला आहे. याबाबत त्यांनी एक पत्रही लिहीले असून, राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
आपण कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार केला नाही. आपण जे काम केले आहे ते कायद्याला धरुण केले आहे. माझ्यावरील सर्व आरोप निराधार आणि खोटे आहेत. 100 कोटी रुपयांचा घोटाळा हा आकडा आला कोठून असा सवालही सोमय्या यांनी केला आहे. सोमय्या यांनी याबाबत नगर विकास खात्याचे सचिव, एमएमआरडीए, मुंबई पोलीस, मीरा-भाईंदर पोलीस, मीरा-भाईंदर महानगरपालिका, वन खाते आदी एक पत्रही लिहीले आहेत. या पत्रात कोणतीही कारवाई करण्यापूर्वी आपली बाजू ऐकून घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, Shridhar Patankar यांच्या कंपनीद्वारे कोट्यावधी रुपयांचे मनी लाँड्रिंग; Kirit Somaiya यांचा CM Uddhav Thackeray यांच्या कुटुंबावर गंभीर आरोप)
दरम्यान, संबंधित प्रकल्प हा पथदर्शी होता. त्यासाठ वापरण्यात आलेली जमीन ही सरकारची आहे. आपल्यावर आरोप झाले म्हणून मी माझी केवळ बाजू मांडत नाही. तर वस्तुस्थिती काय आहे ती सांगतो आहे. आपल्यावर कारवाई करण्यापूर्वी आपले म्हणने ऐकून घ्यावे, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
किरीट सोमय्या यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मिरा भाईंदर शहरामध्ये जवळपास 154 सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम करण्यात आले. त्यापैकी 16 शैचालये बांधण्याचे कंत्राट किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या एका संस्थेला मिळाले. युवा प्रतिष्ठान असे या संस्थेचे नाव. कामात बोगस कागदपत्रे तयार करुन मिरा भाईंदर महापालिकेची दिशाभूल आणि फसवणूक करण्यात आली. तसेच, या कागदपक्षांच्या आधारे जवळपास साडेतीन कोटींपेक्षाही अधिक रकमेची बिले घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. आता पुढे काय घडते याबाबत उत्सुकता आहे.