Kirit Somaiya यांना रोखण्यासाठी रत्नागिरीत पोलिसांची नोटीस; सोमय्या विरोध झुगारत दापोलीकडे रवाना
Kirit Somaiya | PC: Twitter

दापोली (Dapoli) मध्ये अनिल परब (Anil Parab) यांच्या बंगल्यावर हातोडा टाकण्यासाठी निघालेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya)  यांना रत्नागिरी मध्ये रोखण्यासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. मात्र त्याला न जुमानता किरीट सौमय्या दापोलीत जाण्यावर ठाम असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे.

पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी सोमय्यांना नोटीस दिली आहे. या नोटीसी मध्ये सोमय्यांच्या आंदोलनामुळे दापोलीतील स्थनिकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होईल. तसेच जमावबंदीचं कारण देत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर तुम्हाला जबाबदार धरलं जाईल असेही म्हटलं आहे. दरम्यान रत्नागिरीतील भरणा नाक्यावर किरीट सोमय्या यांना निलेश राणेही भेटले. हे देखील नक्की वाचा: Kirit Somaiya: 'चला दापोली, अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया', किरिट सोम्यया यांचे ट्विट .

किरीट सोमय्या ट्वीट

दरम्यान मागील काही दिवसांपासून किरीट सोमय्या महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांवर, नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर आता अनिल परब यांच्यावर सोमय्यांचा निशाणा आहे. अनिल परबांचा दापोली मधी रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. आणि त्याची पाहणी करत हातोडा पाडण्यासाठी प्रतिकात्मक हातोडा घेऊन आज ते दापोलीला रवाना झाले आहेत.

अनिल परब रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत. त्यांनी मीडीयाशी बोलताना आज साई रिसॉर्ट हे सर्व कायदेशीर परवानग्या घेऊनच बांधले आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर आहे किंवा नाही, हे ठरवणारे, किरीट सोमय्या कोण आहेत? रिसॉर्ट बेकायदेशीर असेल तर कोर्टात कायदेशीर लढा द्या. मी देखील कायदेशीर लढाईसाठी तयार आहे आणि हिंमत असेल तर रिसॉर्ट तोडून दाखवाच असेही त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.