Karnataka Maharashtra Dispute: शांतता भंग करणारी वक्तव्ये करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर केंद्राने कारवाई करावी; NCP ची मागणी
Karnataka Chief Minister Basavaraj Bommai (Photo Credit: PTI)

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर तसेच सोलापूर आणि अक्कलकोट शहरांवर दावा सांगितल्यानंतर काही दिवसांनी, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) रविवारी महाराष्ट्र आणि कर्नाटकातील शांतता बिघडवणारी विधाने करणाऱ्यांवर केंद्राने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी रविवारी केली.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो म्हणाले की, ‘कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी फडणवीस-शिंदे महाराष्ट्र सरकारने राज्याच्या सीमेवर कर्नाटक राज्य परिवहन बसेसना समस्या निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली. यासह कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन हिंसाचार घडवण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे म्हटले आहे.’

क्रास्टो ओउढे म्हणाले, ‘होय, कारवाई झालीच पाहिजे, पण अशावेळी बोम्मई यांच्यावरही कारवाई व्हायला हवी कारण महाराष्ट्र-कर्नाटक मुद्द्यावर त्यांनी केलेल्या नकोशा विधानांमुळे काही लोकांच्या मनावर परिणाम झालेला दिसतो. बोम्मई यांनी न्यायप्रविष्ट मुद्दा उपस्थित करायला नको होता. यासह त्यांनी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांवरही दावा करू.’

पुढे त्यांनी नमूद केले की, गेल्या काही दिवसांपासून बोम्मई यांची विधाने लोकांच्या भावना दुखावत आहेत आणि लोकांना त्यांच्या भावना नकारात्मकपणे व्यक्त करण्यासाठी भाग पाडत आहेत. दोन्ही राज्यातील शांतता बिघडवणारी वक्तव्ये करणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. ‘‘भाजपची केंद्रीय समिती बोम्मई यांना अशी विधाने करण्यापासून परावृत्त का करत नाही? त्यांना त्यांचे म्हणणे पटते का?’, असा सवालही क्रास्टो यांनी उपस्थित केला. (हेही वाचा: नवी मुंबईत आसाम भवन तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा)

दरम्यान, महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाच्या मुद्द्यावरून दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री आमनेसामने आले आहेत. दोघेही वादग्रस्त क्षेत्राबाबत आपले हक्क सांगत आहेत. बोम्मई म्हणाले की, ‘महाराष्ट्राने 2004 मध्ये गुन्हा दाखल केला आणि आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत आणि भविष्यातही कायदेशीर लढाई लढणार आहोत. आम्हाला विश्वास आहे. आम्ही आमच्या सीमा, आमचे लोक आणि सर्वांचे रक्षण करू.’