CM Eknath Shinde: नवी मुंबईत आसाम भवन तर आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रातून (Maharashtra) आसाममध्ये (Assam) येणाऱ्या  पर्यटकांची कायमची सोय व्हावी यासाठी आसाम राज्यात महाराष्ट्र भवन (Maharashtra Bhawan) उभाराण्यात येणार आहे. तसेच नवी मुंबईत (Navi Mumbai) देखील आसामहून येणाऱ्या पर्यटकांसाठी आसाम भवन (Assam Bhawan) उभारण्यात येणार आहे. एवढचं नाही तर महाराष्ट्र (Maharashtra) आणि आसाम (Assam) राज्यांमध्ये असलेली भक्ती परंपरा, वीररसाची परंपरा, भाषिक आणि सांस्कृतिक साम्यानुसार दोन राज्य सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ यावी यासाठी आसाममध्ये 'छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन' उभारण्यात येणार आहे. मराठी भाषी राजपत्रित अधिकाऱ्यांनी याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी केली होती. ही मागणी पुर्ण करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी ही मोठी घोषणा केली आहे. राज्यात झालेल्या सत्तातरानंतर शिंदे गट आणि गुवहाटी हे नातं अतुट आहे. तरी शिंदे गटाच्या या गुवहाटी ट्रीपची (Guwhati Trip) राज्याच्या राजकीय वर्तुळात चांगलीचं चर्चा सुरु आहे.

 

आसाम आणि महाराष्ट्र (Maharashtra) राज्यातील उद्योग, व्यापार, दळणवळण, पर्यटन आणि परस्पर संबंध वृद्धिंगत व्हावेत तसेच महाराष्ट्रात आसाम भवन (Assam Bhawan In Maharashtra)  आणि आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारून दोन्ही राज्ये सांस्कृतिकदृष्ट्या अधिक जवळ यावीत यासाठी हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली आहे. महाराष्ट्रातून (Maharashtra) माता कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीसुविधेत या निर्णयामुळे मोठी मदत होईल. (हे ही वाचा:- Chhatrapati Sambhaji On Governor: राज्यपालांच्या वक्तव्याशी राज्यकर्ते सहमत? सवाल उपस्थित करत छत्रपती संभाजी राजेंचा सरकारवर हल्लाबोल)

 

शिंदे गटाचे  मंत्री, आमदार, खासदार, सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्यासह गुवहाटी येथे कामाख्या देवीच्या दर्शनासाठी पोहोचले आहेत. गुवहाटीत शिंदे गटाचं जंगी स्वागत करण्यात आलं. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आसामध्ये महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी तात्काळ मंजुरी दिल्याचा निर्णय अत्यंत महत्वपूर्ण आहे.