कल्याण: वडापाव खाल्याने ग्राहकांना विषबाधा, विक्रेत्यावर गुन्हा दाखल
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

कल्याण (Kalyan) येथील एका ठिकाणी वडापाव खाल्याने ग्राहकाला विषबाधा (Food Poisoning) झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर वडापाव (Vada Pav) खाल्याने तिघांना ही विषबाधा झाली आहे.

कल्याण पश्चिमेला असणाऱ्या रुचिरा वडापाव सेंटरमधून तीन जणांनी वडापाव विकत घेतला. मात्र वडापाव खाल्याच्या काही वेळातच त्यांना उलट्या, मळमळ सारखे वाटण्यास सुरुवात झाली. यामुळे तिघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.(दमदार पावसानंतर मुंबईत काविळ, गॅस्ट्रो, मलेरिया रुग्णांच्या संख्येत वाढ)

तसेच रेल्वेस्थानकच्या बाहेर मिळणारे उघड्यावरील पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात असे वारंवार सांगितले जाते. तरीही ग्राहक तेथूच पदार्थ खरेदी करतात. मात्र काही वेळेस शिळे अन्न खाल्याने विषबाधा होण्याची शक्यता फार असते. याचाच प्रत्यय आता कल्याणमध्ये आल्याने विक्रेत्यावर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.