Representational Image (Photo Credits: Pexels)

पावसाळा आणि आजारपण हे जणू समीकरणचं झालं आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या दमदार पावसानंतर आता साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईची अगदी दैना झाली. त्यानंतर मुंबईकरांसमोर अजून एक नवे संकट उभे ठाकले आहे. (पावसाळ्यात पायांचे आरोग्य जपण्यासाठी खास '3' टिप्स!)

महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईत जून महिन्यात काविळचे एकूण 282 रुग्ण आढळून आले. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत गॅस्ट्रो, मलेरिया रुग्णांच्या संख्येतही यंदा वाढ झाली आहे. गॅस्ट्रोचे 777 तर मलेरियाचे 310 रुग्ण आढळून आले. त्याचबरोबर लेप्टोस्पायरोसिसचे 5 रुग्ण मुंबईत आढळून आले. मात्र या आजारामुळे कोणाचाही बळी गेलेला नाही. (पावसाळ्यात ही 5 फळे खाल्ल्याने आजारापासून होईल बचाव)

मुंबईची स्थिती पाहता नागरिकांनी बाहेरील अन्नपदार्थ पूर्णपणे टाळावेत, पाणी उकळून प्यावे तसंच स्वच्छतेच्या इतर बाबी पाळाव्यात, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. तसंच रोगप्रतिकारकशक्ती कमी असलेल्या व्यक्तींनी आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी, असेही आरोग्य विभागाकडून सूचित करण्यात आले आहे.