मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात अधिकाऱ्याची आत्महत्या
Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) एका अधिकाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे. आज दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास टर्मिनल 2 च्या पार्किंगम इमारतीत ही घटना घडली. अभिषेक बाबू, (Abhishek Babu) असे या मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. अभिषेक बाबू हे कनिष्ठ गुप्तचर अधिकारी (Junior Intelligence Officer) पदावर कार्यरत होते.

बाबू यांनी इमारतीवरुन उडी मारल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या पी 4 परिसरात ही घटना घडली. अद्याप बाबू यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही. सहार पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (हेही वाचा - पनवेल: खारघर सेक्टर 35 मधील साईस्प्रिंग इमारतीवरुन पडून तरुणीचा मृत्यू)

मुंबईकरांमध्ये आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईमधील आत्महत्यांच्या घटनांमध्ये 7.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तणाव बेरोजगारी, असुरक्षित भविष्य, प्रेम संबंध आदी कारणांमुळे लोक आत्महत्या करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.