Juhu Chowpatty: मुंबई महापालिका जुहू चौपाटीचा कायापालट करणार, जुहू चौपाटी परिसरात होणार 'हे' मोठे बदल

मुंबई महापालिका शहरात काही विशेष ठिकाणी मोठे कायापालट करण्यात येणार आहे.  महापालिकेकडून ही विशेष मोहिम राबवण्यात येणार आहे. येत्या काहीचं दिवसांत मुंबईत महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहे. तरी त्याच पार्श्वभुमिवर का होईना पण मुंबई महापालिका मोठे विकास काम करताना दिसत आहेत. तरी जुहू चौपाटी परिसरात महापालिका परिसरात काही खास काम करणार आहेत. जुहू चौपाटी हा मुंबई शहरातील महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी एक आहे. मुंबईसह मुंबई बाहेरील पर्यटकांची जुहू बिच परिसरात दाखल होणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. तरी या परिसरातील स्वच्छतेचं काम गेले काही दिवसांपासून सुरु आहे. तसेच महापालिका बिचपरिसरात रंगबेरंगी लाईट्स आणि स्वच्छ प्रसाधन गृहांची व्यवस्था करणार आहे. जुहू बिच परिसरातील विकास कामांबद्दल मुंबई महापालिकेकडून माहिती देण्यात आली आहे.

 

संरक्षक भिंतींवर सामाजिक जबाबदारीचे संदेश देणारी चित्रे रेखाटण्यात येणार आहेत. मुलांसाठी आकर्षक खेळणी, रंगीबेरंगी रोषणाईत चमकणारे खांब पर्यटकांचे लक्ष वेधून घेणार आहेत. स्वच्छतेसाठी चौपाटीवर ठिकठिकाणी कचराकुंड्या ठेवल्या जाणार आहेत. जुहू चौपाटी परिसरात अनेक बडे बॉलिवूड कलाकार वास्तव्यास आहेत. त्यामुळे या चौपाटीचे पर्यटनाच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. या चौपाटीला दररोज हजारो पर्यटक भेट देत असतात. या पार्श्वभूमीवर पालिकेने मुंबई सुशोभीकरण आणि सौंदर्यीकरण प्रकल्पात जुहू चौपाटीचा समावेश केला आहे. (हे ही वाचा:-Mumbai Marathon 2023: मुंबई मॅरेथॉन, तब्बल 55 हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग, मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांच्यासह, देवेंद्र फडणवीस, किरण रिजजू यांचीही उपस्थिती)

 

जुहू चौपाटी परिसरात आकर्षक रोषणाई, प्लास्टिकमुक्त परिसर, नैसर्गिक विस्तीर्ण वाळू, पर्यटकांना बसण्यासाठी जागा, मुलांना आकर्षण ठरणारी खेळणी, ग्राफिक वॉल, सेल्फी पॉइंट यांसह चौपाटी परिसरात ग्रॅनाइटचे पदपथ, हिरवीगार शोभिवंत झाडे अशा विविध बाबींमधून परिसर सुशोभित करण्यात येणार आहे. तरी या संपूर्ण विकास कामास जवळपास ६ कोटी रुपयांचा खर्च होणार असणं अपेक्षित आहे.