Jaffer Bhai of Delhi Darbar Passes Away (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबईमध्ये (Mumbai) मुघलाई पदार्थांसाठी प्रसिद्ध असणारे रेस्टॉरंट म्हणजे जाफरभाई (Jaffer Bhai) यांचे दिल्ली दरबार (Delhi Darbar). 1973 पासून जाफरभाई या व्यवसायामध्ये आहेत. आता मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली दरबारचे संस्थापक जाफरभाई यांचे कोरोना विषाणूमुळे (Coronavirus) निधन झाले आहे. ते 85 वर्षांचे होते. जाफरभाई मन्सुरी (Jafferbhai Mansuri) असे त्यांचे नाव आहे. 90 च्या दशकामध्ये मुंबईमध्ये दिल्ली दरबारचा स्वतःचा असा वेगळा थाट होता, आताही मुंबईमधील सर्वात लोकप्रिय रेस्टॉरंटपैकी हे एक समजले जाते. जाफरभाई यांना ‘Biryani King of Mumbai’ असे संबोधले जात असे.

जाफरभाई यांना पहिल्यापासूनच अन्न व्यवसायात काम करायचे होते. लोकांना खायला घालणे त्यांना फार आवडायचे. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण सोडले आणि आपल्या कुटुंबाचा छोटासा कॅटरिंगचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. ते स्वतः मालक असूनही, त्यांनी सर्व छोट्या-मोठ्या गोष्टी अगदी बारकाईने शिकून घेतल्या. त्यांचे पहिले आउटलेट मुंबईच्या ग्रँट रोड येथे 1973 मध्ये अस्तित्वात आले आणि तेव्हापासून त्याचा विस्तार भारत आणि दुबईमधील अनेक ठिकाणी झाला.

(हेही वाचा: मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह)

दिल्ली दरबारला त्यांच्या मोघलाई पदार्थांसाठी, बिर्याणीसाठी, त्यांच्या रेस्टॉरंटमधील भारतीय पदार्थांसाठी पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. मुख्यतः मांसाहारी पदार्थांसाठी हे रेस्टॉरंट अतिशय लोकप्रिय होते. दरम्यान, जाफरभाई हे बर्‍याच दिवसांपासून आजा होते आणि 2 सप्टेंबर पासून त्यांना ब्रेच कँडी रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र आज त्यांचे निधन झाले.