Maha Vikas Aghadi: रामदास कदम यांनीच मंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्या यांना पुरवली? 'त्या' व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर शिवसेनेत खळबळ
रामदास कदम (Photo credit : Youtube)

शिवसेना नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्या तीन कथित ऑडिओ क्लिप (Audio Clip) व्हायरल झाल्या आहेत. रामदास कदम यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओ क्लिपनंतर शिवसेनेत एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, रामदास कदम यांनीच विद्यमान मंत्री अनिल परब (Anil Parab) यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना पुरवली आहे, असा दावा मनसेचे राज्य सरचिटणीस आणि खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर (Vaibhav Khedekar) यांनी केला. मात्र, रामदास कदम यांनी या ऑडिओ क्लिप बनावट असल्याचे सांगत या संभाषणाशी आपला काहीच संबंध नसल्याचे म्हटले आहे.

खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदमध्ये  वैभव खेडेकर म्हणाले की, महाविकास आघाडीत काही सुर्याजी पिसाळ तयार झाले आहेत असे म्हणत त्यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या मुरुड येथील रिसॉर्टची माहिती किरीट सोमय्या यांना दिली आहे. रामदास कदम यांच्याकडून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम सुरू आहे. आम्ही या सगळ्याचे पुरावे आमच्या नेत्यांकडे सोपवले आहेत, असेही वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. हे देखील वाचा- Aaditya Thackeray on Amit Thackeray: अमित ठाकरे यांच्या टिकेला मंत्री आदित्य ठाकरे यांचे प्रत्युत्तर

या व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम म्हणाले की, या ऑडिओ क्लिप पूर्णपणे बनावट असून मला बदनाम करण्यासाठी हा कट रचला जात आहे. मात्र, या तीन ऑडिओ क्लिपमुळे एकच खळबळ उडाली असून शिवसेना काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.