महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षाने कंबर कसली आहे. दरम्यान, राजकीय नेत्यांकडून विविध मुद्द्यांवरुन आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. याचपाश्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. तसेच शहराची अवस्था पाहून शिवसेनेकडून अपेक्षा ठेवून काहीच मिळणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते. यानंतर शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आमित ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळ्यांना मुंबईवर विश्वास आहे. मुंबई महापालिकेवर विश्वास आहे. आपण जी कामे करतो, ती एका रात्रीत होणारी नाहीत. ते काम दिसायला लागते, करावा लागते, असा बाण आदित्य ठाकरे यांनी अमित ठाकरे यांच्यावर सोडला आहे. हे देखील वाचा-शरद पवार यांना पंतप्रधान तर अजित पवार मुख्यमंत्री झालेलं पाहायचं आहे- खासदार अमोल कोल्हे
अमित ठाकरे काय म्हणाले होते?
"जोपर्यंत हे लोक सत्तेत आहेत, तोपर्यंत आपले रस्ते सुधारणारच नाहीत. चांगले रस्ते बनवणे हे काही रॉकेट सायन्स नाही. फक्त चांगले व्हिजन असायला हवे. राज साहेबांकडे तसे व्हिजन होते म्हणूनच नाशिकमध्ये छान रस्ते झाले. हे मी नव्हे पत्रकारच सांगतात. पाठीमागील 25 वर्षे मुंबईची सत्ता ज्यांच्याकडे आहे, त्यांना हे काम का जमत नाही? असा सवाल करीत अमित ठाकरे यांनी केला होता."
रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे होणारे ट्रॅफिक जॅम, अपघात, वाया जाणारे इंधन या गोष्टींमुळे अगदी सर्वांचंच कंबरडं मोडलंय, पण सत्ताधारी राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या भ्रष्टाचारी आघाडीला त्याच्याशी काही देणंघेणं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्डेविरोधी आंदोलनं करतोय. खड्डयांबाबत उच्च न्यायालयातही वारंवार खोटं बोलणाऱ्या या भ्रष्टाचाऱ्यांना आता जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होऊ शकेल, अशी अमित ठाकरे यांनी गुरुवारी (30 सप्टेंबर) फेसबूक पोस्ट केली होती.