Inflammable Material In On Mumbai-Addis Ababa Flight: मुंबईहून आदिस अबाबाला (Mumbai-Addis Ababa) जाणाऱ्या फ्लाइट (Flight) मध्ये ज्वलनशील पदार्थ (Inflammable Material) घेऊन जाणाऱ्या प्रवाशाला सहार पोलिसांनी (Sahar Police) अटक (Arrest) केली. हा प्रवासी कोलकाता येथील रहिवासी आहे. समीर बिस्वास असं या प्रवाशाचं नाव असून त्याला तो घेऊन जात असलेला पदार्थ ज्वलनशील आहे याची कल्पना नव्हती.
समीर बिस्वासने पोलिसांना सांगितले की, त्याला पाच लिटर प्लास्टिकचे कॅन आणि दोन किलो पावडर काँगोमधील त्याच्या मालक नवीन शर्माकडे नेण्यास सांगितले होते. पोलिसांनी आता हरियाणाचा रहिवासी असलेल्या शर्माला लुकआउट नोटीस जारी केली आहे. तसेच अन्य पाच आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. (हेही वाचा -Mumbai: विमानाच्या बाथरुममध्ये ओढली बिडी; प्रवाशाला अटक, सहार पोलिसांकडून गुन्हा दाखल)
मुंबई-अदिस अबाबा इथिओपियन एअरलाइन्सच्या (ET 641) फ्लाइटमधील बिस्वास यांच्या बॅगेला 16 ऑगस्ट रोजी आग लागली, ज्यामुळे ज्वलनशील रासायनिक पदार्थ वाहून हवाई सुरक्षेशी तडजोड केल्याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. आरोपीने ज्वलनशील रसायन का वाहून नेले याचे नेमके कारण शर्माच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (हेही वाचा -Man Smoking In Plane Toilet: तरुणाला विमानाच्या टॉयलेटमध्ये धूम्रपान करताना रेड हॅंड पकडलं, गुन्हा दाखल)
प्राप्त माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी, टर्मिनल 2 वर, सकाळी 10.30 च्या सुमारास फ्लाइट क्रूला चेक-इन केलेल्या बॅगमधून धूर निघताना दिसला. या विमानात 200 हून अधिक प्रवासी होते. पदार्थाचा प्रकार आणि तो वाहून नेण्यामागचा हेतू अद्याप उघड झालेला नाही, परंतु सूत्रांनी हा हायड्रोजन स्पिरिट असल्याचा संशय व्यक्त केला आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण पूर्ण केलेले बिस्वास नोकरीसाठी काँगोला जात होते. याप्रकरणी पोलिसांनी बिस्वास, अंबरनाथ येथील विश्वनाथ सेंजूरधर, नंदन यादव, अंधेरी (पूर्व) येथील अखिलेश यादव, सुरेश सिंग यांना अटक केली आहे.