Indurikar Maharaj Case: इंदोरीकर महाराज यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश, अपत्य प्राप्तीसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी आज सुनावणी
Indurikar Maharaj | (File Image)

निवृत्ती काशिनाथ देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संगमनेर (Sangamner) प्रथम वर्ग न्यायालयाने याबाबत समन्स बजावण्यात आले आहे. अपत्यप्राप्ती संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी दाखल गुन्ह्यात इंदुरीकर महाराज यांच्यावर खटला सुरु आहे. त्याची आज सुनावणी पार पडते आहे. त्यामुळे या सुनावणीस इंदुरीकर महाराज आज हजर राहणार का? याबाबत उत्सुकता आहे. महाराजांवर PCPNDT कायद्यानुसार खटला गुन्हा दाखल आहे.

किर्तनकार निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये अपत्य प्राप्तीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेत पोलीस तक्रार करण्यात आली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत PCPNDT कायद्याअंतर्ग जुलै 2020 मध्ये गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांना गुन्ह्यातून मुक्त केले. दरम्यान, अंनिसने जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर हा गुन्हाच रद्द करावा यासाठी इंदुरीकर महाराजांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर हायकोर्टाने इंदुरीकर यांची मागणी फेटाळत गुन्हा कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आता या प्रकरणावर संगमनेर प्रथम वर्ग न्यायालयात आज सुनावणी होणार आहे.

इंदुरीकर महाराज यांनी शिर्डी येथील ओझर येथे यआयोजित किर्तनात केलेल्या वक्तव्यावरुन खरा वाद सुरु झाला. इंदोरीकर महाराज यांनी किर्तन निरुपणादरम्यान म्हटले होते की, स्त्रीसंग जर सम तिथीला झाला तर मुलगा होतो. विषम तिथीला झाला तर मुलगी. यासाठी त्यांनी काही पुराणातील दाखलेही दिले. त्यावर अंनिसने आक्षेप नोंदवला. महाराजांचे हे वक्तव्य म्हणजे गर्भलिंग निदान निवडीची जाहीरात असल्याचाच आरोप करण्यात आला. त्यानुसार PCPNDT सल्लागार समितीने इंदुरीकर यांना नोटीस पाठविण्यात आली. या नोटीशीद्वारे त्यांना खुलासा करण्याचे आदेश देण्यात आले होते. याच काळात महाराजांवर गुन्हा दाखल करण्यासाठी प्रथम वर्ग न्यायालयात 156 (3) याचिका दाखल झाली होती. ज्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आणि महाराज कायद्याच्या कचाट्या आले. (हेही वाचा, Indurikar Maharaj On Gautami Patil: गौतमी पाटील हिच्याबद्दल इंदुरीकर महाराज असे काय म्हणाले? घ्या जाणून)

व्हिडिओ

इंदुरीकर महाराज यांची वादग्रस्त वक्तव्य

शिर्डीच्या ओझर येथील कीर्तनातून केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. तो युट्यूबवरही उपलब्ध होता. अजूनही त्या वक्तव्याबाबतच्या काही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर आढळतात. लेटेस्टली मराठी ते वक्तव्य आणि व्हिडिओ याची पुष्टी करत नाही. मात्र, त्यांनी उच्चारलेले शब्द पुढील प्रमाणे होते. जे सोशल मीडियावरील व्हिडिओत महाराज बोलताना दिसतात. स्त्रीसंग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्रीसंग जर अशा वेळेला झाला तर अपत्ये रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वॉलिटी खराब, असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला. तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस जन्माला आला. हिरण्यकश्यपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला.