धुळवडी निमित्त खासदार नवनीत राणा यांचं आदिवासी महिलांसोबत पारंपरिक नृत्य; पहा व्हिडिओ
खासदार नवनीत राणा (PC - ANI)

आज राज्यभरात धुळवडीचा उत्सव साजरा झाला. अनेक राजकीय पक्षातील नेत्यांनी धुळवडीची (Melghat) मजा लुटली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनीदेखील आपल्या पतीसोबत मेळघाटात आदिवासींसोबत (Tribals People) होळी (Holi) साजरी केली. नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा (Ravi Nana) यांनी आदिवासी लोकांसोबत कोरकू नृत्य सादर केलं.

होळी निमित्त नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा दरवर्षी मेळघाटातील अनेक गावांमध्ये जावून आदिवासींना शुभेच्छा देतात. यावर्षीही ते होळी निमित्त 5 दिवस मेळघाटातील विविध गावात गेले आणि आदिवासी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. यंदा नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत पारंपारिक आदिवासी नृत्य करुन होळी साजरी केली. सध्या सोशल मीडियावर त्यांचा डान्स व्हायरल होत आहेत. (हेही वाचा - मला दर 10 वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही; जितेंद्र आव्हाड यांचे गणेश नाईक यांना प्रत्युत्तर)

होळी सनानिमित्त नवनीत राणा आणि रवी राणा कारा गावातील मेघनाथ यात्रेत सहभागी झाले होते. यावेळी रवी राणा यांनी आदिवासींच्या पारंपरिक नृत्यात डफली वाजवली. तसेच नवनीत राणा यांनी दिलखुलास नृत्यांचा आनंद घेतला. नवनीत राणा यांनी आज सकाळी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत नागरिकांना होळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रंगपंचमी साजरी करताना पर्यावरण पुरक रंगांचा वापर करा आणि काळजी घ्या, असं आवाहन केलं आहे.