ठाण्याच्या जोशी-बेडेकर कॉलेजमध्ये (Joshi Bedekar College) एनसीसीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाणी प्रकाराचे पडसाद आज (4 ऑगस्ट) विधिमंडळातही उमटले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हा मुद्दा उचलला. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या प्रकरणामध्ये संबंधित दोषींवर Anti-Ragging Law अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याची दाखल घेत सरकारला कडक पावलं उचलण्याच्या सूचना केल्या आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदनाला माहिती देताना दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
काल पासून सोशल मीडीयामध्ये वायरल झालेल्या जोशी बेडेकर कॉलेज मधील व्हिडिओ वर सार्यांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी अशाप्रकारे झालेली मारहाण नींदनीय असल्याची म्हटली आहे. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या माहितीमध्ये विद्यार्थ्यांनी सिनीयर्स कडून चूकीची वागणूक मिळत असल्याची तक्रार बोलून दाखवली आहे. यामध्ये शिक्षकाची नियुक्ती न झाल्याने सिनियर्स कडूनच प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये त्यांचे अज्ञान लपवण्यासाठी शिक्षा, मारहाण केली जाते असे ते म्हणाले आहेत.नक्की वाचा: Viral Video: NCC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनीअर विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण; रोहित पवारांकडून घटनेची चौकशी करण्याची मागणी .
In the Maharashtra Assembly, LOP Vijay Wadettiwar raised the issue of NCC cadets being beaten by a man during a training session in Thane.
Speaker Rahul Narvekar directed govt to take action on this issue.
DCM Ajit Pawar assured the house that strict action will be taken…
— ANI (@ANI) August 4, 2023
जोशी बेडेकर कॉलेजच्या प्राचार्या सुचित्रा नाईक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये वायरल व्हिडिओ मधील मारहाण करणारी व्यक्ती शिक्षक नाही. पण संबंधितांना कारवाई होईल आणि ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे त्यांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.