Viral Video: NCC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनीअर विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण; रोहित पवारांकडून घटनेची चौकशी करण्याची मागणी

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेची चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केली आहे.

Viral Video: NCC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनीअर विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण; रोहित पवारांकडून घटनेची चौकशी करण्याची मागणी
NCC students Viral Video (PC - Twitter)

Viral Video: ठाण्यातील बांदोडकर आणि जोशी बेडेकर महाविद्यालयात NCC च्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सिनीअर विद्यार्थ्यांकडून अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या घटनेची चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून या घटनेसंदर्भात पोस्ट केली आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, अशी मारहाण हा प्रशिक्षणचा भाग आहे का? आणि नसेल तर मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातच विद्यार्थ्यांना अतिरेक्यांप्रमाणे झालेल्या मारहाणीच्या या घटनेची सखोल चौकशी करुन कठोर कारवाई करावी.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 03, 2023 06:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).