Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

Protest Outside Silver Oak: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी 8 एप्रिल रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी ( ST Worker) केलेल्या हल्ला प्रकरणात 103 कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी गुप्तचर यंत्रणेवर (Intelligence Department) प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार शरद पवार यांच्या घरावर एसटी कर्मचारी आंदोलन करणार असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणेला याअगोदरचं मिळाली होती.

परंतु, संबंधित पोलीस स्टेशनकडून पोलीस बंदोबस्त लावण्यात उशीर झाला. त्यामुळे ही घटना घडली. राज्य गुप्तचर विभागाने तीन महिन्यांपूर्वीचं एसटी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा दिला होता. तसेच शरद पवारांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्त तैनात करण्याची सूचनाही दिली होती. या सर्व सुचना झोन II चे DCP योगेश कुमार यांना देण्यात आल्या होत्या. असे असूनही सिल्व्हर ओक निवासस्थानी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला नाही. (हेही वाचा - Pune: खासदार सुप्रिया सुळेंच्या हस्ते 12 एप्रिलला होणार पुण्यातील सिम्बायोसिस सेंटर फॉर जेरियाट्रिक केअरचे उद्घाटन)

विशेष म्हणजे शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ल्या होणार ही माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांकडून बंदोबस्त लावण्यात आला नाही. घटना घडली त्यावेळी पोलिसांच्या आधी पत्रकार याठिकाणी पोहोचले. पोलिसांच्या या निष्काळजीपणामुळे अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

घटनेच्या चौकशीसाठी समितीची स्थापन -

दरम्यान, शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला होणार ही माहिती गुप्तचर विभागाने दिली असतानासुद्धा संबंधित विभागाकडून हलगर्जीपणा का करण्यात आला. या संदर्भात प्रश्न उपस्थित होत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात चौकशी करण्याकरिता पोलीस उपायुक्त विश्वास नागरे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांनी 8 एप्रिलला दुपारी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक (Silver Oak) या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. यावेळी जमावाने आक्रमक होऊन पवार यांच्या घरावर दगड, चप्पल फेकही केली. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते आणि इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली आहे. न्यायालयाने गुणरत्न सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच इतर कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.