Lok Sabha Elections 2019: इम्तियाज जलील यांना MIM चं खासदारकीचं तिकीट; औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीच्या रिंगणात
Imtiaz Jaleel | File Photo | (Photo Credits: Twitter/imtiaz jaleel)

Aurangabad Lok Sabha Constituency:  MIM पक्षाचे आमदार इम्तियाज जलील ( Imtiaz Jaleel) यांना आता पक्षाकडून खासदारकीचं तिकीट देण्यात आलं आहे. सोमवारी रात्री हैदराबाद येथे ओवेसेंनी इम्तियाझ अलींच्या नावाची घोषणा केली आहे. एमआयएम (MIM) आणि वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi ) ते उमेदवार असतील. त्यामुळे औरंगाबादमध्ये आता शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे, काँग्रेसकडून सुभाष झांबड आणि इम्तियाज जलील अशी तिहेरी लढत होणार आहे. Lok Sabha Elections 2019: टोपी आणि शिटी आणून दिल्यानंतर देशाची चौकीदारी करा, अकबरुद्दीन औवेसी यांचा नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल

इम्तियाज जलील यांचे ट्विट

आगामी लोकसभा निवडणूक 'ME' नाही तर 'WE" साठी असेल औरंगाबाद वासियांना आवाहन करत मतदान करण्यासाठी आवाहन केलं आहे.महाराष्ट्र विधानसभेमध्ये एमआयएम पक्षाचे दोन आमदार आहेत. त्यापैकी एक म्हणजे इम्तियाज जलील. मराठा आरक्षणानंतर इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्रात मुस्लीम समाजाला आरक्षण मिळावा हा मुद्दा विधानसभेमध्ये उचलला होता.

यंदा लोकसभेच्या निवडणूका देशात 7 आणि महाराष्ट्रात चार टप्प्यात होणार आहेत. औरंगाबादला लोकसभेच्या निवडणूकीचे मतदान 23 एप्रिलला होणार आहे. तर मतमोजणी 23 मे दिवशी होईल.