मुंबईमध्ये सकाळपासून दडी मारलेला पाऊस आता पुन्हा बरसण्यासाठी सुरूवात झाली आहे. दुपारनंतर मुंबई, ठाणे, पालघर परिसरात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील चार तास मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यामध्येही दुपारपासून पावसाचा जोर वाढला आहे. आज (26 जुलै) ठाण्यात वागळे इस्टेट भागात शिवसेना शाखेजवळ घरावर झाड कोसळलं आहे. या घटनेत कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही. Maharashtra Monsoon 2019 Updates: महाराष्ट्रात मान्सून सक्रिय; विदर्भ, मराठवाडा भागात दमदार पावसाची शक्यता
मुंबईसह महाराष्ट्रामध्ये आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच 28 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईमध्ये यंदा जुलै महिन्यातच दमदार पाऊस बरसल्याने पाण्याची पातळी वाढल्याचं चित्र आहे. मुंबईतील तानसा धरण भरलं आहे.
अतिवृष्टीचा इशारा असल्याने मुंबईकरांना सतर्क रहावे असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. सध्या पावसाचा मुंबईतील रेल्वे आणि रस्स्ते वाहतूकीवर परिणाम झालेला नाही. मुंबईचं ट्राफिक धीम्या गतीने सरकत असले तरीही सारी वाहतूक सुरळीत आहे. आजपासून विकेंडला सुरूवात होत असल्याने तुम्ही पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असल्यास पुरेशी खबरदारी घेऊन पावसाचा आनंद घ्या.