सातार्यामध्ये (Satara) प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीजवळ (Afzal Khan's tomb at Pratapgad) उभारण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरूवात झाली आहे. ही कारवाई वन विभाग आणि महसूल विभाग यांच्याकडून करण्यात आली आहे. सध्या प्रतापगडाच्या पायथ्याशी काम सुरू असलेल्या भागात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलिसांचा देखील कडक बंदोबस्त आहे. कायदा व सुववस्था राखण्यासाठी सध्या मोठा फौजफाटा सातार्यात दाखल आहे.
दरम्यान अफजलखानच्या कबरीजवळ अनधिकृत बांधकाम उभारल्यानंतर काही हिंदू संघटना आणि शिवप्रेमींनी त्यांच्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर या बांधकामाला हटवण्यासाठी निवेदनही देण्यात आले होते. आज त्या कारवाईला सुरूवात झाली आहे. 10 नोव्हेंबर हा दिवस शिवप्रताप दिन म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशीच शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला होता. नक्की वाचा: Shiv Pratap Din 2022 Date: शिवप्रताप दिन कधी असतो? जाणून घ्या या सोहळ्या मागील ऐतिहासिक घटना!
पहा ट्वीट
Maharashtra | Anti-encroachment drive underway near Afzal Khan's tomb in Satara near Pratapgad, in compliance with the Bombay High Court order: Satara Police pic.twitter.com/44BvZO7jWE
— ANI (@ANI) November 10, 2022
2006 साली अनधिकृत कामकाजावरून प्रकरण न्यायालयात गेले होते तसेच हा परिसर सील करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत बांधकाम तोडण्याला हिरवा कंदिल दिला होता. आज सकाळ पासून जेसीबी, क्रेनच्या मदतीने हे पाडकाम करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. अफझल खानाच्या कबरीच्या लगत असलेल्या खोल्या जमीनदोस्त करण्यात येणार आहेत.