स्वत:च्या पोटच्या मुलांसमोर आपल्या 8 महिन्याच्या गरोदर पत्नीची निर्घृण हत्या केल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पिंपरी-चिंचवडमधील (Pimpri-Chinchwad) फुगेवाडीत ही घटना घडली या असून या घटनेने संपुर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जातेय. या घटनेतील आरोपी प्रवीण घेवंदे याने आपली गरोदर पत्नी पूजा घेवंदे हिच्यावर कु-हाडीने वार करून निघृण हत्या केली. त्यानंतर प्रवीणने स्वत: वरच धारदार शस्त्रांनी वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे लोकसत्ताने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण याचे गेल्या काही दिवसांपासून मानसिक संतुलन ठिक नव्हते. त्यामुळे आजारी असलेल्या प्रवीणला भेटण्यासाठी बाळंतपणासाठी माहेरी गेलेली त्याची पत्नी पूजा फुगेवाडीत तिच्या घरी आली. ती आलेली पाहताच तिच्या साडे तीन वर्षाच्या आणि दोन वर्षाच्या मुलांनी तिला कडकडून मिठी मारली. त्यावेळी बेसावध असलेल्या पूजाच्या मानेवर प्रवीणने कु-हाडीचा वार केला. यात ती गंभीर जखमी होऊन तिचा जागीच मृत्यू झाला.
हेही वाचा- अहमदनगर: एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या, पारनेर तारुक्यातील गुणोरे गावातील घटना
यात तिच्या एका मुलालाही गंभीर दुखापत झाली. यामुळे बैचेन झालेल्या प्रवीणने स्वत:वरही धारदार शस्त्राने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. यात आरोपी प्रवीणला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर महानगरपालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
या घटनेत प्रवीण घेवंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याने असे का असावे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.