क्रृर पतीने (Husband) केलेल्या धक्कादायक घटनेत पत्नीचा (Wife) मृत्यू झाला आहे. ही घटना ठाणे (Thane) येथे बोपर परिसरात घडली. या पतीने आपल्या 35 वर्षीय पत्नीला जीवंत जाळले. (Husband Burns Wife Alive in Thane) रुग्णालयात उपचार सुरु असतानाच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर महिला 90% भाजली होती. अधिक माहिती अशी की, प्रीती शांताराम पाटील आणि त्यांच्या मुली समीरा (14) आणि समिक्षा (11) या बोपर परिसरात त्यांच्या घराला लागलेल्या आगीत गंभीर भाजल्या होत्या. या तिघीही 90% भाजल्या होत्या. यातील आईचा तर मृत्यू झाला आहे. 90 टक्के भाजलेल्या मुलींवर सध्या उपचार सुरू आहेत, अशी माहिती मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक एस.आर. बागडे यांनी दिली.
महिलेचा पती प्रसाद शांताराम पाटील 40) याला घटनेत भाजल्याने त्याच्यावरही उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 5.30 वाजता ही आग लागली होती, परंतु त्यांना सकाळी 8.30 च्या सुमारास याची माहिती मिळाली, त्यामुळे तीन तासांचा उशीर झाला. आरोपीचे दुसर्या महिलेशी प्रेमसंबंध होते आणि तो त्याची पत्नी आणि मुलींना त्रास देत होता. त्याने कट रचला आणि त्याची पत्नी आणि मुलींना जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आणि प्रक्रियेत त्यालाही दुखापत झाली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
प्रेमविवाह, अनैतिक संबंध, आंतरजातीय विवाह यातून हत्या, आत्महत्या यांसारखे प्रकार वाढले आहेत. अशा नागरिकांचे वेळीच समुपदेशन करुन त्यांना योग्य रस्ता दाखविण्याची आवश्यकता असल्याची भावना समाजाचे अभ्यासक आणि मनासशास्त्र विभागात काम करणारे लोक व्यक्त करतात.