Hussain Dalwai On PV Narasimha Rao: नरसिंह राव यांनी 'त्यांना' मशीद पाडण्यात मदत केली होती- हुसेन दलवाई
Husain Dalwai | (Photo Credits: X)

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि पीव्ही नरसिंह राव यांच्यासह कृषी शास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna Award) जाहीर झाल्याबद्दल आम्हाला दु:ख नाही. आम्ही त्याबद्दल आनंदीच आहोत. मात्र, पीव्ही नरसिंह राव (Hussain Dalwai On PV Narasimha Rao) यांनी 'त्यांना' बाबरी मशिद पाडण्यास मदत केली होती, असे काँग्रेस नेते आणि माजी खासदार हुसेन दलवाई (Husain Dalwai) यांनी म्हटले आहे. दोन माज पंतप्रधान आणि एक कृषी शास्त्रज्ञ अशा तिघांना भारतरत्न देण्यात जाहीर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तशी एक्स हँडलद्वारे घोषणा केली. या घोषणेनंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

हुसेन दलवाई काय म्हणाले?

माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंग आणि पीव्ही नरसिंह राव यांच्यासह कृषी शास्त्रज्ञ डॉ एम एस स्वामिनाथन यांना भारतरत्न जाहीर झाल्याबद्दल आम्हाला दु:ख नाही. आम्ही त्याबद्दल आनंदीच आहोत. मात्र, पीव्ही नरसिंह राव यांनी 'त्यांना' बाबरी मशिद पाडण्यास मदत केली होती, असे सांगतानाच हुसेन दलवाई पुढे म्हणाले, सर्वात महत्त्वाची बाब अशी की, चौधरी चरण सिंह यांना भारतरत्न दिले जाणे. कारण, ते खरोखरच लोकनेते होते आणि डॉ. एम एस स्वामीनाथन हे तर कृषी तज्ज्ञच होते. त्यांच्यामुळेच तर भारत अन्नधान्यात स्वयंपूर्ण होऊ शकला. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारताने कृषी क्षेत्रात प्रगती केली. भारत अन्नधान्य निर्यात करु शकला. त्यामुळे त्यांना भारतरत्न देणे ही चांगलीच बाब आहे. (हेही वाचा, Bharat Ratna: चौधरी चरण सिंग, पीव्ही नरसिंह राव आणि डॉ. एमएस स्वामिनाथन यांना भारतरत्न जाहीर; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा)

व्हिडिओ

भारतरत्न पुरस्कार

भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून भारत रत्न पुरस्काराकडे पाहिले जाते. हा पुरस्कार लिंगनिरपेक्ष असतो. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा नावलैकीक वाढविण्यासाठी आणि अविरत समाजसेवा केलेबद्दल हा पुरस्कार दिला जातो. समाजकारण, अर्थकारण, राजकारण, पर्यावरण, शिक्षण, साहित्य, कला आणि विज्ञान, क्रीडा यांसारख्या वैविध्यपूर्ण क्षेत्रात भूषवलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीची दखल घेऊन भारत सरकार हा पुरस्कार जाहीर करते. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याद्वारे हा पुरस्कार 2 जानेवारी 1854 मध्ये देण्यात आला. हा एक नागरी पुरस्कार आहे. आतापर्यंत देशभरातील अनेक नामवंत व्यक्तीमत्वांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ज्यामध्ये माजी पंतप्रधान, कलाकार, खेळाडू, वैज्ञानिक आणि इतरही काही मान्यवरांचा समावेश आहे. सन 2024 या विद्यमान वर्षात आतापर्यंत (जानेवारी ते फेब्रुवारी) कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण आडवाणी, चौधरी चरण सिंह, पी व्ही नरसिह्मराव, एम एस स्वामीनाथन या मान्यवरांना भारतरत्न देऊन गौरविण्यात आले आहे.