Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Mumbai News:  मुंबई सहार विमानतळावर बीएमडब्ल्यू कारने (BMW) एका सीआरपीएफच्या  जवानाला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत जवान गंभीर जखमी झाला आहे. सद्या त्याच्यावर अंधेरीच्या रुग्णालयात ICU वार्डमध्ये उपचार सुरु केला आहे. वाहन चालकावर सहार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळावर या घटनेमुळे काही वेळ गोंधळ सुरु होता. राहुल शर्मा असं पीडित जवानाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  ह्रदय कावर (१९) नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 1 ऑक्टोबर रोजी पहाटे 4 वाजता कॉन्स्टेबल राहुल शर्मा हा महामार्गावरील सीआरपीएफ चेकपोस्ट क्रमांक 1 वर नाकबंदी ड्युटीवर होता. भरधाव वेगाने जाणारी बीएमडब्ल्यू कार (एमएच 03 डीडी 0305) प्रथम प्लास्टिकच्या बॅरिकेडला धडकली आणि त्यानंतर कॉन्स्टेबल राहुल शर्माला धडकली. शर्मा जमिनीवर कोसळले, डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या तोंडातून आणि डोक्यातून रक्त येत होते. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला अंधेरी पूर्व येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले, जिथे तो सध्या आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.

या घटनेच्या आधारे हृदय कावरवर कलम २७९ (रॅश ड्रायव्हिंग), आयपीसी कायद्याच्या ३३८ (जीव धोक्यात आणणारा कायदा) आणि मोटार वाहन कायद्याच्या १८४ (धोकादायक वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.