Tricolour (File Image)

'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) मोहिमे अंतर्गत देशभरात यंदा 75 व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. आझादी का अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा करताना सरकारकडून 'हर घर तिरंगा' मोहिमेच्या माध्यमातून बहुतांश घरामध्ये तिरंगा फडकला होता. पण आता हा तिरंगा सन्मानपूर्वक उतरवणं आणि नीट जपून ठेवणं आवश्यक आहे. कळत-नकळत तिरंग्याचा अपमान होऊ नये म्हणून काही नियम लक्षात ठेवणं गरजेचे आहेत.

भारताचा तिरंगा हा सुस्थितीमध्ये उतरवणं गरजेचे आहे त्यानंतर तो घरीच ठेवणार असाल तर त्याची घडी एका विशिष्ट प्रकारामध्ये करणं आवश्यक आहे. झेंड्याची नारंगी आणि हिरवी बाजू घडी झाला. नंतर दोन्ही बाजूने ती घडी घालून अशोक चक्र वरच्या बाजूला येईल अशा स्थितीमध्ये ठेवा.

मुंबई मध्ये इंडियन ऑईल पेट्रोल पंप कडून तिरंगा जमा केले जात आहेत. त्यामुळे जर तुम्हांला घरी तिरंगा ठेवणार नसाल तर तो इंडियन ऑईलच्या कोणत्याही पेट्रोल पंपावर देऊ शकतात. त्यांच्याकडून चांगल्या अवस्थेतील तिरंगे नीट ठेवले जातील आणि खराब झालेल्या तिरंग्याची विल्हेवाट लावली जाईल.

पहा ट्वीट

झेंडा घडी करण्याची योग्य पद्धत

हे देखील नक्की वाचा: Independence Day 2022: अंतराळात फडकला भारताचा तिरंगा, Space Kidz India टीमची अभिमानास्पद कामगिरी; पहा व्हिडीओ .

दरम्यान My Green Society कडून देखील घरात तिरंगा ठेवू न इच्छिणार्‍यांकडील तिरंगे जमा केले जाणार आहेत. मुंबई, ठाण्यामध्ये ही एनजीओ घरोघरी जाऊन तिरंगे गोळा करणार आहे. यासाठी त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप नंबर दिले आहेत. 9820099022/9167761697 या व्हॉट्सअ‍ॅप नंबर वर ते संपर्क साधू शकतात.