Unlock 5: महाराष्ट्रात आजपासून ग्राहकांसाठी खुली झाली हॉटेल्स, रेस्टॉरन्ट आणि बार; जाण्यापूर्वी सरकारच्या 'ह्या' महत्वाच्या नियमांची करा उजळणी
Hotel Reopen in Mumbai (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) देशभरात लॉकडाऊन (Lockdown) जरी सुरु असले तरी योग्य ती खबरदारी घेत हळूहळू अनलॉक होताना दिसत आहे. महाराष्ट्रात हा अनलॉकचा पाचवा (Unlock 5) टप्पा सुरु असून या टप्प्यात आजपासून राज्यातील हॉटेल्स (Hotels), रेस्टॉरन्ट (Restaurant)  आणि बार (Bar) 50% ग्राहकांच्या क्षमतेसह आजपासून सुरु झाले आहेत. गेल्या 6 महिन्यापासून ही हॉटेल्स बंद होती. त्यामुळे हॉटेल मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या विरोधात हॉटेल संघटनांनी सरकारशी बातचीत करुन अखेर आजपासून मुंबईसह अनेक ठिकाणची हॉटेल्स सुरु झाली आहेत.

मुंबईकरांसह अनेक खवय्यांमध्ये या निर्णयाने आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून आजपासून खवय्यांना जरी हॉटेल्समध्ये जाता येणार असले तरी ग्राहकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी हॉटेल, बार धारकांना सरकारने विशेष नियमावली दिली असून ग्राहकांनीही त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. Maharashtra Unlock 5 Guidelines: महाराष्ट्र सरकारने जारी केल्या अनलॉक 5 च्या मार्गदर्शक सूचना; राज्यात 50 टक्के क्षमतेसह हॉटेल, फूड कोर्ट, रेस्टॉरंट्स आणि बार उघडण्यास परवानगी

ग्राहकांनी हॉटेल्स, बारमध्ये जाण्यापूर्वी घ्यावयाची काळजी:

1. जर तुम्हाला सर्दी, खोकला, ताप यांसारखी लक्षणे असतील तर हॉटेल्स मध्ये जाणे टाळावे.

2. हॉटेल्सच्या प्रवेशद्वारावर हॉटेल मालकांकडून करण्यात येणा-या कोरोना चाचणीला सहकार्य करावे. हा कुणाला दुखावण्याचा प्रयत्न नसून सुरक्षेचा प्रश्न आहे हे लक्षात घ्या.

3. आपल्या जवळ सॅनिटायजर बाळगा.

4. मास्क लावूनच हॉटेलमध्ये बसा. केवळ खाताना मास्क काढता येईल हे लक्षात घ्या.

5. सोशल डिस्टंसिंगचे पालन करा.

6. हॉटेलला जाण्यापूर्वी संबंधित हॉटेलमध्ये फोनवरुन बुकिंग करा.

7. तुम्ही हॉटेलात गेल्यावर तुम्ही ज्या जागेवर बसला आहात तेथील टेबल्समध्ये सुरक्षित अंतर ठेवले आहे का याची काळजी घ्या.

8. खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा.

9. हॉटेलमध्ये कापडाच्या नॅपकिन ऐवजी विघटनशील कपड्याचा वापर करावा.

10. टेबलवर तुमच्या वस्तू ठेवू नका.

11. पैसे भरताना डिजिटल पद्धतीचा शक्यतो वापर करा. ज्यामुळे लोकांचा संपर्क टाळता येईल.

सरकारने ते हॉटेल्स आणि बार मालकांसाठी तयार केलेली नियमावली ही केवळ त्यांच्यासाठी आपणही देशाचे दक्ष नागरिक आहोत असे समजून तुम्हीही त्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.