पुणे (Pune) जिल्ह्यातील शिरुर (Shirur) येथील तरुणांच्या एका Whatsapp Group वर पाकिस्तान येथून Honey Trap केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्राप्त माहितीनुसार, शिरुर येथील तरुणांच्या एक व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये काही पाकिस्तानी फोन क्रमांकाचा अचानक शिरकाव झाला. त्यानंतर या ग्रुपवर अश्लिल व्हिडिओंचा मारा करण्यात आला. ग्रुपवर प्रचंड प्रमाणात आलेले अश्लिल व्हिडिओ पाहायला मिळताच अनेकांनी ग्रुपमधून बाहेर पडण्याच निर्णय घेतला. दरम्यान, ग्रुपमधील सदस्यांना युवती असल्याचे भासवून फोनही यायला लागले.
घडल्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर ग्रुप अॅडमीनने ग्रुमध्ये आलेले हे क्रमांक (ज्यावरुन अश्लिल व्हिडिओ शेअर करण्यात आले होते.) तातडीने हटवले. दरम्यान, ग्रुपच्या इनव्हाईट लिंकमधून या ग्रुपमध्ये पाकिस्तानी युवकांनी प्रवेश केल्याची प्राथमिक माहिती पुढे आल्याचे समजते. या क्रमांकावर पाकिस्तानी मुलींची छायाचित्रे असल्याचेही समजते.
दरम्यान, हा प्रकार घडल्यानंतर पोलिसांनी अवाहन केले आहे की, असा काही प्रकार निदर्शनास आल्यास त्या क्रमांकाच्या संपर्कात राहू नये. अशा क्रमांकाची माहिती शक्य तितक्या लवकर पोलिसांना द्यावी. पुरेशी माहिती नसताना तसेच कारणाशिवाय विदेशातील कोणत्याही क्रमांकाशी संपर्क ठेऊ नये. अशा क्रमांकांना आपली व्यक्तिगत माहिती शेअर करु नये.
दरम्यान,अनेकदा विरोधी राष्ट्र छुपे युद्ध खेळण्यासाठी असे प्रकार करु शकते, असे सायबर तज्ज्ञ सांगतात. (हेही वाचा, पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याने, भारतीय जवानाला अटक)
Honey Trap हा गेल्या काही काळातील अत्यंत चर्चिला गेलेला आणि गंभीर मुद्दा बनला आहे. काही महिन्यांपूर्वीच Honey Trap प्रकरणात लष्कारातील जवानांनाही पाकिस्तानी युवतींनी आपल्या जाळ्यात ओढल्याचे पुढे आले होते. त्यामुळे गेल्या काही काळापासून देशातल हे प्रस्थ वाढल्याचे पाहायला मिळते आहे. Whatsapp Group तसेच खास करुन फेसबुक, ट्विटर आदिंच्या माध्यमातून लष्करी अधिकारी, अथवा वरिष्ठ अधिकारी असल्याचे भासवत देशातील नेटीझन्सना Honey Trap जाळ्याच ओढण्याचे प्रकार घडू पाहात आहेत.