MIG29 | Twitter

भारताने आता श्रीनगर एअर बेस (Srinagar Air Base) वर MiG-29 fighter jets चे अपग्रेडेड स्क्वॉड्रन तैनात केले आहेत. पाकिस्तान आणि चीन या दोन्ही देशांशी मुकाबला करण्यासाठी त्यांचा वापर केला जाऊ शकतो. The Tridents squadron यांना आता ‘Defender of the North’ म्हणून ओळखलं जातं. त्यांनी MiG-21 squadron ची जागा घेतली आहे. प्रामुख्याने त्याचा वापर पाक आणि चीनी आक्रमणासाठी वापरले जात होते.

कश्मीर व्हॅली मध्ये श्रीनगर आहे. उंचावर असलेल्या या भागावरून दोन्ही सीमा पाहता ही जागा योग्य आहे. Indian Air Force pilot Squadron Leader Vipul Sharma यांनी ANI शी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, The MiG-29 सार्‍या निकषांची पूर्तता करत असल्याने त्याचा फायदा होणार आहे.

मिग-21 पेक्षा मिग-29 चे अनेक फायदे आहेत, काश्मीर खोऱ्यातील आपल्या जबाबदारीच्या क्षेत्राचे अनेक वर्षे यशस्वीपणे रक्षण करण्यात आणि 2019 मध्ये बालाकोट हवाई हल्ल्यानंतर एफ-16 ने पाकिस्तानी दहशतवादी तळ उध्वस्त करण्यात यशस्वी देखील झाले होते.

मिग-29 या वर्षी जानेवारीत श्रीनगर हवाई तळावर दाखल झाले आणि लडाख सेक्टरमध्ये तसेच काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर उड्डाण केले. चीनने हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केल्यास ते येथून रिअ‍ॅक्शन देतील. 2020 च्या गलवान संघर्षानंतर चिनी बाजूने आलेल्या धोक्याचा सामना करण्यासाठी लडाख सेक्टरमध्ये तैनात केलेले मिग-29 हे पहिले विमान होते आणि तेव्हापासून असे अनेक प्रयत्न फसले आहेत.