पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याने, भारतीय जवानाला अटक
फोटो सौजन्य - फाइल फोटो

राजस्थान (Rajasthan) मधून जसलमेर येथून एका भारतीय जवानाला अटक करण्यात आली आहे. तर भारतीय सैन्यासंबंधित अतिशय संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या संशयावरुन जवानाला अटक करण्यात आली आहे.

महिला एजंटच्या जाळ्यात अडकलेल्या जवानाने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून संवेदनशील माहिती दिल्याचा खुलासा झाला आहे. सोमवीर असे या जवानाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवत असल्याचे पोलिस आणि लष्कराला कळले होते. त्यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने त्याच्यावर पाळत ठेवून अखेर अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तान येथील महिलेने जवानाला हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकवले. त्यानंतर सोमवीर या महिलेला गुप्त माहिती पुरवण्याचे काम करीत होता. तसेच सोमवीर या महिलेला प्रशिक्षणाच्या दरम्यान भेटल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.