Lockdown: महाराष्ट्रात 5864 मद्यविक्री दुकाने सुरु, दिवसभरात 34 हजार 352 ग्राहकांना घरोपच मद्यसेवा
Liquor | entational Image | (Photo Credits: Pixabay)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट आणि लॉकडाऊन (Lockdown) काळात महाराष्ट्र सरकारने घरपोच मद्यसेवा द्यायला सशर्थ परवानगी दिली. या परवानगीचा फायदा घेत मद्यविक्री करणाऱ्या अनेक व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरु केली आहेत. उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 5864 मद्यविक्री दुकाने सुरु आहेत. तर दिवसभरात 34 हजार 352 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा (Home Delivery Liquor Service) दिली जात आहे. अवैध मार्गाने केल्या जाणाऱ्या मद्यविक्रिवर कायदेशीर कारवाईही करण्यात येत आहे, अशी माहिती उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली आहे.

उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 5864 मद्यविक्री दुकाने सुरू. दिवसभरात 34 हजार 352 ग्राहकांना घरपोच मद्यसेवा. अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत 5984 गुन्ह्यांची नोंद, 2664 आरोपींना अटक तर 16 कोटी 16लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (हेही वाचा, खाजगी रुग्णालयातील 80% बेड्स कोविड 19 रुग्णांसाठी राखीव, उपचारांचे दरही निश्चित; राज्य सरकाराचा महत्त्वपूर्ण निर्णय)

ट्विट

लॉकडाऊन काळात सर्व दुकाने बंद असताना मद्यविक्री दुकांने सुरु करण्यास सरकारे परवानगी दिली. मात्र, कोरोना व्हायरस संकटात घेण्यात आलेल्या लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन झाले. नागरिकांनी मद्यविक्री दुकानांसमोर मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. त्यातून कोरोना व्हायरस संसर्गाचा धोका वाढला. हा धोका टाळण्यासाठी मग सरकारने घरपोच मद्यसेवा देण्यास मान्यता दिली.