
शिमगा (Shimaga) आणि गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav) काळात कोकणवासीयांचे पाय आपोआपच कोकणातल्या घराकडे वळतात. आज होलिका दहन आहे. त्यामुळे रात्री होळी पेटवण्यासाठी आणि पुढील काही दिवस कोकणात शिमगोत्सव (Shimgotsav) साजरा करण्यासाठी अनेक चाकरमानी कोकणात निघाले आहे. मात्र आज मध्य रेल्वेवरून कोकणात जाणारी मांडवी एक्सप्रेस (Mandovi Express) चक्क तीन तास उशिराने धावत असल्याने अनेक प्रवाशांचं दिवसभराचं गणित बिघडलं आहे. Holi Special Trains: कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार 19 आणि 20 मार्चला 'पश्चिम रेल्वे'च्या होळी स्पेशल ट्रेन्स
मांडवी एक्सप्रेस सीएसएमटी ते मांडवी पर्यंत नियमित धावते. सकाळी 7.10 ला सीएसएमटीवरून सुटते. पण आज ही ट्रेन सकाळी 8.50 ला सुटली त्यामुळे दिवसभर ती उशिराने धावत असल्याने कोकणात जाणारे प्रवासी संतापले आहेत. अनेक प्रवाशांचे हाल होत आहेत.कोकणात जाण्यासाठी मध्य रेल्वेवर होळी दरम्यान धावणार 'या' विशेष ट्रेन्स
मध्य रेल्वेकडून स्पष्टीकरण
कोकणातून रात्री येणारी कोकणकन्या एक्सप्रेस सकाळी मांडवी एक्सप्रेस म्हणून चालवली जाते. मात्र कोकणकन्या गाडीलाच उशिरा झाल्याने सकाळी मांडवी एक्सप्रेस मुंबईहून उशिराने निघाली. असे स्पष्टीकरण मध्य रेल्वेकडून देण्यात आले आहे. सध्या होळीच्या दिवसात अनेक चाकरमणी कोकणात प्रवास करतात त्यामुळे मुंबई, पुण्याहून कोकणात प्रवास करण्यासाठी अनेक विशेष गाड्या सोडल्या आहे. परंतू दोनच ट्रॅक असल्याने सिग्नल लागल्यास अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडते. त्यामध्ये आता मांडवी उशिराने धावत असल्याने अनेकांचे हाल होतात.
आज रात्री होलिका दहन झाल्यानंतर दुसर्या दिवशी धुळवड आणि पाचव्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. तसेच कोकणामध्ये स्थानिक ग्रामदेवतांची पालखी खेळण्याचा सोहळा रंगतो.