Accident प्रतिकात्मक प्रतिमा (फोटो सौजन्य - Pixabay)

Chandivali Hit-and-Run Case: मुंबईतील (Mumbai) चांदिवली (Chandivali) येथे हिट-अँड-रनची घटना (Hit-and-Run) घडली आहे. बुधवारी संध्याकाळी एका 64 वर्षीय महिलेला 19 वर्षीय डिलिव्हरी बॉयने दुचाकीने धडक दिली. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला असून डिलिव्हरी बॉयविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिरशा पुजारी असं या दुचाकीस्वाराचं नाव आहे. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती कॉम्प्लेक्सजवळ सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिरशा पुजारी याने सरोली सिंग यांना त्याच्या दुचाकीने धडक दिली.

स्थानिकांनी सरोली सिंगला यांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल केले. या धडकेमुळे पीडितेला गंभीर दुखापत झाली. महिलेच्या नाकातून आणि तोंडातून रक्त वाहत होते. पोलिसांनी पुजारीविरुद्ध बेदरकारपणे गाडी चालवल्याचा आरोप ठेवून एफआयआर दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत. (हेही वाचा -Kurla BEST Bus Accident: कुर्ला दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा)

गेल्या आठवड्यात मुंबईतील वांद्रे येथे एका 25 वर्षीय मॉडेलचा हिट अँड रन अपघातात मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, मॉडेल तिच्या मैत्रिणीसोबत मोटरसायकलवरून जात असताना पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. शिवानी सिंग असे मृत महिलेचे नाव असून ती शहरातील मालाड भागातील रहिवासी होती. (हेही वाचा:Kurla Best Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातात मृतांचा आकडा 6 वर; 43 जखमी, बस चालकावर गुन्हा दाखल)

शुक्रवारी रात्री वांद्रे येथील बाबासाहेब भीमराव आंबेडकर रोडवर ही घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की, शिवानीने मोटारसायकलवरून उडून पाण्याच्या टँकरच्या चाकाखाली आली. सुदैवाने तिचा मित्र अपघातातून बचावला. यानंतर टँकर चालकाने वाहनावरून उडी मारून अपघातस्थळावरून पळ काढला.