पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, पुतण्या, सुनबाईंनी अडवल्या जागा, सामान्य कार्यकर्त्यांची गोची; महाराष्ट्र विधानसभेत पुन्हा एकदा 'घराणेशाही जिंदाबाद'; संपूर्ण यादी
Untitled Maharashtra Legislative Assembly | (Photo Credit: Archived, edited, representative images)

निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव मानला जातो. पण, विधानसभा निवडणूक 2019 मध्ये विविध जागांवरुन नव्याने निवडूण आलेल्या उमेदवारांच्या यादीवर लक्ष टाकता लोकशाहीच्या उत्सवातील आनंद काही मोजक्याच राजकीय घराण्यांमध्ये फिरत असल्याचे पाहायला मिळते. नव्या विधानसभेत विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांचा मुलगा, मुलगी, नातू, पुतण्या अशा मंडळींनीच जागा आडवल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेत या वेळी पुन्हा एकदा 'घराणेशाही जिंदाबाद' (Hereditary Politics) असेच चित्र पाहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) याचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे असलेल्या रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यापासून ते बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या पर्यंत. तसेच, माजी मख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या चिरंजीव धीरज देशमुख (Dheeraj Deshmukh) यांच्यापासून ते माजी मंत्री विमल मुंदडा यांची सून नमिता मुंदडा आणि खासदार सुरेश धानोरकर यांची पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्या पर्यंत अनेकांनी प्रवेश केला आहे. पाहूयात घराणेशाहीतून पुढे आलेले विधानसभेतील नवनिर्वाचीत आमदार.

घराणेशाहीतून आलेले नवे आमदार

आदित्य ठाकरे - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र

रोहित पवार - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू

धीरज देशमुख - माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख

अदिती तटकरे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुनील तटकरे यांची मुलगी

योगेश कदम - पर्यावरणमंत्री व शिवसेना नेते रामदास कदम यांचे पुत्र

झिशान सिद्दीकी - माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी

चेतन तुपे - माजी खासदार विठ्ठलराव तुपे यांचा मुलगा

सुनील राणे - माजी मंत्री दत्ता राणे यांचा मुलगा

नमिता मुंदडा - माजी मंत्री विमल मुंदडा यांची सून

शिरीष नाईक - माजी मंत्री सुरूपसिंह नाईक यांचा मुलगा

संजय जगताप - माजी आमदार चंदूकाका जगताप यांचा मुलगा

प्रतिभा धानोरकर - चंद्रपूरचे विद्यमान खासदार सुरेश धानोरकर यांच्या पत्नी

ऋतुराज पाटील - माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचे पुतणे

सिद्धार्थ शिरोळे - माजी खासदार अनिल शिरोळे यांचा मुलगा

लता सोनावणे - जळगाव घरकूल घोटाळ्यात तुरुंगवास झालेले शिवसेना आमदार चंद्रकांत सोनावणे यांच्या पत्नी

राहुल ढिकले - माजी आमदार उत्तमराव ढिकले यांचे पुत्र

प्रताप अडसड - भाजप आमदार अरुण अडसड

मेघना बोर्डीकर - माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची मुलगी

इंद्रनील नाईक - माजी मंत्री मनोहर नाईक यांचे पुत्र

श्रीनिवास वनगा - भाजपचे माजी खासदार चिंतामण वनगा यांचे पुत्र

यामिनी जाधव - मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची पत्नी

अतुल बेनके - राष्ट्रवादीचे माजी आमदार वल्लभ बेनके यांचे पुत्र

सुनील कांबळे - माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू

प्रजक्त तनपुरे - माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे पुत्र

संदीप क्षीरसागर - मावळते मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुतणे

शेखर निकम - माजी खासदार गोविंदराव निकम यांचे पुत्र

राजेश पाटील - माजी आमदार नरसिंह पाटील

(हेही वाचा, राज ठाकरे यांचा मनसे घेऊ शकतो गगनभरारी पण त्यासाठी करावे लागतील हे उपाय)

वरील यादी ही घराणेशाहीतून नव्याने आमदार झालेल्या राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांची आहे. परंतू, यासोबतच त्यांचे इतर नातेवाईक गेली अनेक वर्षे विधानसभेवर प्रतिनिधीत्व करत आहेत. जसे की, रोहित पवार यांचे काका अजित पवार, धीरज देशमुख यांचे बंधू अमित देशमुख ही काही उदाहरणादाखल नावे. त्यामुळे वरील यादी पाहता निवडणूक या लोकशाहीच्या उत्सवात सर्वसामान्यांना संधी मिळणार का तसेत, या उत्सवाचा आनंद घेण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार का? असाच सवाल उपस्थित केला जात आहे.