कोरोनाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे जालन्यात लहान मुलांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी
Representational Image (Photo Credits: Wikimedia Commons)

कोरोनाचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत चालला असून आता त्याचा परिणाम लहान मुलांवरही दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांना तातडीने मदत केली जावी म्हणून जालन्यात (Jalna Coronavirus Update) हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत. TV9 ने दिलेल्या वृत्तानुसार, ज्या बालकांना कोरोना झाला आहे आणि ज्यांना कुणीच नाही किंवा ज्या बालकांचे आई-वडील कोरोनाने दगावले आहेत, अशा बालकांच्या संगोपनासाठी आणि उपचारासाठी या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

कोरोना झालेल्या ज्या बालकांची काळजी घेण्यास कोणीही नाही किंवा ज्या बालकांचे पालक कोरोनामुळे दगावले आहेत अशा बालकांची माहिती बाल कल्याण समिती, जालना व चाईल्ड लाईन टोल फ्री क्र. 1098 तसेच खालील संपर्क क्रमांकावर देण्यात यावी. जेणेकरुण सदर बालकांना आवश्यक मदत वेळेत पुरवता येईल, असे आवाहन जालन्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.हेदेखील वाचा-

Pune: भारत बायोटेक कडून कोवॅक्सिन लस तयार केली जाणार, ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस प्लांट सुरु होण्याची शक्यता

हेल्पलाईन क्रमांक

>> बाल कल्याण समिती टोल फ्री क्रमांक-1098, संपर्क क्रमांक- 9890841439

>> शासकीय मुलांचे बालगृह, शंकरनगर संपर्क क्रमांक- 9404000405

>> जिल्हा बाल संरक्षण कक्ष संपर्क क्रमांक – 7972887043, 8830507008

>> महिला व बालविकास विभाग, मदत कक्ष संपर्क क्रमांक- 8308992222, 7400015518

>> जिल्हा महिला व बालविकास विभाग संपर्क क्रंमाक- 02482-224711

महाराष्ट्रात कोरोनाचे आणखी 39,923 रुग्ण आढळले असून गेल्या 24 तासात 695 जणांचा बळी गेला आहे. तर भारतात आज 3,26,098 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 3,890 जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत 3,53,299 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.