Heavy Rains In Mumbai: पावसामुळे मुंबई लोकलमध्ये अडकलेल्या 290 प्रवाशांची NDRF पथकाकडून सुटका
Heavy Rains In Mumbai | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुसळधार पावसामुळे मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local Trains) अडकलेल्या प्रवाशांची राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (NDRF) जवानांकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. ही लोकल सीएसएमटी येथून कर्जतला निघाली होती. तर दुसरी लोकल टिटवाळ्याहून  सीएसएमटी (CSMT) स्थानकाकडे निघाली होती. दरम्यान, मस्जिद रोड (Masjid Road) ते भायखळा रेल्वे (Bhaykhala Stations स्थानकादरम्यान पाणी साचल्याने दोन लोकल मध्येच अडकल्या. या दोन्ही लोकलमध्ये सुमारे 200 प्रवाशी असल्याची माहिती होती. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तामध्ये सुरुवातीला 40 आणि त्यानंतर 52 प्रवाशांची सुटका करण्या आल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, एनडीआरएफ पथकाच्या जवानांनी लोकलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका केल्याच्या वृत्ताला सत्य प्रधान यांनी दुजोरा दिला आहे. सत्य प्रधान हे एनडीआरएफचे महासंचालक आहेत. त्यांच्याच हवाल्याने एएनआयने वृत्त दिले आहे. दरम्यान, मुंबईतील पाऊस आणि एकूणच परिस्थितीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी नजर ठेऊन आहेत. मुंबई आणि महाराष्ट्रातील पावसाच्या स्थितीवर पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला आहे. तसेच, पावासमुळे उद्भवलेल्या स्थितीत केंद्र सरकार महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहीन असेही ते म्हणाले. (हेही वाचा, Maharashtra Rain Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना, नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे अवाहन)

एएनआय ट्विट

दरम्यान, मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले होते की, मुंबईत अनेक ठिकाणी अतवृष्टी झाली आहे. त्याचा फटका रेलवे वाहतूक सेवेला बसला आहे. त्यामळे अनेक ठिकाणी रेल्वे मार्गावर पाणी साचले आहे. परिणामी सीएसएमटी-ठाणे तसंच सीएसएमटी-वाशी लोकल सेवा बंद करण्यात आली आहे. दरम्यान, ठाणे ते कर्जत आणि वाशी ते पनवेल दरम्यान शटल सेवा सुरु आहे. जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी ही माहिती साधारण सायंकाळी 7 वाजणेच्या सुमारास दिली होती.