Heart Surgery: मुंबई पोलीस कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांनी रक्तदान करुन तिच्याशी जोडले रक्ताचे नाते
Police Constable Akash Gaikwad | (Photo Credits: Twitter )

मुंबई पोलीस सेवेत (Mumbai Police) असेलेले कॉन्स्टेबल आकाश गायकवाड (Constable Akash Gaikwad) यांनी एका गरजू मुलीसाठी रक्तदान केले. या निमित्ताने आकाश गायकवाड यांनी जनसेवेप्रती पोलिसांचे असलेले रक्ताचे नाते पुन्हा एकदा अधोरेकीत केले आहे. एका मुलीवर हृदय शस्त्रक्रिया (Heart Surgery) करण्यात येणार होती. मात्र निसर्ग चक्रीवादळ स्थितीमुळे तिला रुग्णालयात दाखल करता आले नाही. उन, वारा, पाऊस, बॉम्बस्फोट असो की इतर कोणती नैसर्गिक आपत्ती. मुंबई पोलीस नेहमीच जनतेच्या हिताला आणि मदतीला प्राधान्य देतात.

दरम्यान, संबंधित मुलीवरील शस्त्रक्रियेदरम्यान ए पॉझिटीव्ह गटातील रक्ताची आवश्यकता होती. ही माहिती पोलीस कॉन्स्टेबल आकाश गायकवाड यांना कळतातच त्यांनी रक्तदान केले. प्राप्त माहितीनुसार आकाश गायकवाड यांचा रक्तगटही ए पॉझिटीव्ह आहे. (हेही वाचा, Coronavirus: मुंबई पोलीस हेड कॉन्स्टेबल यांच्याकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी CM Relief Fund साठी योगदान)

ट्विट

सीपी मुंबई पोलीसांनी आपल्या @CPMumbaiPolice या ट्विटर हँडलवरुन कॉन्स्टेबल गायकवाड यांच्या रक्तदानाबद्दल माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांनी सीपी मुंबई टविटर हँडलवरची पोस्ट आपल्या @MumbaiPolice हँडलवर रिट्विट केली आहे. तसेच तरुण मुलीला निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा असा संदेश देत #MumbaiFirst हा टॅगही वापरला आहे.