Karnataka Shocker: पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून व्यक्तीने मित्राचा चिरला गळा, प्यायले रक्त; कर्नाटकातील भीषण घटना

महेशवर छोट्या चाकूने हल्ला करण्यात आल्याने त्याचा जीव वाचला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी महेशने पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याने पोलिसांना घटनेची माहिती लगेच मिळाली नाही.

Karnataka Shocker: पत्नीशी अफेअर असल्याच्या संशयावरून व्यक्तीने मित्राचा चिरला गळा, प्यायले रक्त; कर्नाटकातील भीषण घटना
Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

कर्नाटकात (Karnataka) हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आधी पत्नीच्या प्रियकराचा गळा चिरला आणि नंतर त्याचे रक्त प्यायले. आपल्या पत्नीचे आपल्या मित्रासोबत अफेअर असल्याचा संशय या व्यक्तीला होता, त्यानंतर त्याने अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्राचा गळा चिरून त्याला जखमी केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेतली. या व्यक्तीने त्याच्या एका मित्राला संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवण्यास सांगितले होते.

हे प्रकरण कर्नाटकातील कोलार येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोलार जिल्ह्यातील चिंतामणी येथे राहणारा विजय हा भाजीपाला आणि कपड्यांचा छोटासा व्यवसाय करायचा. मालाची वाहतूक करण्यासाठी तो महेश नावाच्या तरुणाचे वाहन भाड्याने घेत असे. यादरम्यान महेश विजयच्या घरी येऊ लागला तेव्हा विजयच्या पत्नीशी त्याचे बोलणे सुरू झाले. काही दिवसांपूर्वी विजयला समजले की त्याची पत्नी आणि महेश एकमेकांसोबत तासनतास बोलत आहेत. यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि विजयने महेशला पत्नीपासून दूर राहण्याचा इशाराही दिला. मात्र महेश आणि विजयच्या पत्नीचे संभाषण सुरूच राहिले.

यामुळे संतापलेल्या विजयने माल नेण्याच्या बहाण्याने महेशला 19 जून रोजी एका निर्जन भागात बोलावले. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. नंतर विजयने महेशचा गळा चिरला व त्याचे रक्त प्यायले. ही संपूर्ण घटना विजयचा आणखी एक मित्र जॉनने कॅमेऱ्यात कैद केली व त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. व्हिडिओमध्ये विजय रक्त पिताना दिसत आहे. (हेही वाचा: Delhi Crime: दिल्लीत भररस्त्यात डिलिव्हरी एजंटला बंदुकीच्या धाकेवर लुटले; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद)

महेशवर छोट्या चाकूने हल्ला करण्यात आल्याने त्याचा जीव वाचला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याआधी महेशने पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल केली नसल्याने पोलिसांना घटनेची माहिती लगेच मिळाली नाही. मात्र हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी महेशचा माग काढला आणि त्याच्या तक्रारीच्या आधारे आरोपी विजयला अटक केली.

(The above story first appeared on LatestLY on Jun 26, 2023 04:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).