Online Game खेळण्यादरम्यान तरुणावर जडले प्रेम, लग्नासाठी हरियाणातून महाराष्ट्रात आली प्रेयसी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Pixabay)

सध्या लोक एकमेकांना डेट करण्यासाठी ऑनलाईन डेटिंग अॅपचा वापर करतात हे सर्वांनाच माहिती आहे. पण ऑनलाईन गेम खेळताना तुमचे एखाद्यासोबत रिलेशनशिप सुरु होईल यावर कोणीही विश्वासच ठेवणार नाही. मात्र हे खरं असून एका मराठी मुलाचे हरियाणातील मुलीसोबत रिलेशनशिप सुरु झाले. यासाठी आता हरियाणातून तरुणी थेट महाराष्ट्रात लग्नासाठी पोहचली आहे.(Kolhapur Shocker: पतीचं निधन आणि गतिमंद दत्तक मुलीच्या निराशेतून मायलेकींंची आत्महत्या)

या दोघांचे रिलेशनशिप कोरोनाच्या काळात सुरु झाले. तर जून 202 मध्ये महाराष्ट्रातील बारामती जवळ असलेल्या भिगवन गावातील एक मुलगा आणि हरियाणातील भवानी जिल्ह्यातील दादरी तालुक्याती बधराई स्थित गावातील एक मुलगी ऑनलाईन फ्री फायर गेम खेळायचे. ऑनलाईन गेम खेळतानाच या दोघांची मैत्री झाली आणि त्याचे नंतर प्रेमात रुपांतर झाले. एकमेकांचे मोबाईल क्रमांक शेअर झाल्यानंतर व्हॉट्सअॅपवर हे दोघे एकमेकांसोबत गप्पा मारायचे. हळूहळू ओळख वाढली आणि त्यांचे प्रेमाचे नाते सुरु झाले.

याच दरम्यान, मुलीच्या घरातील मंडळींनी तिचे लग्न करण्याचे ठरविले. परंतु मुलीने लग्नासाठी नकार देत घरातून पळ काढला. हजारो किलोमीटरचे अंतर पार करुन मुलगी पुण्यातील दौंड रेल्वे स्थानकात पोहचली. तेव्हा मुलाच्या मामाने तिला घरी आणले.

दुसऱ्या बाजूला मुलीच्या घरातील मंडळींनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात केलीय. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता ती पुण्यात असल्याचे कळले. तेव्हा मुलीच्या घरातील मंडळी पुण्याला येत तिची भेट घेतली. मुलाच्या आणि मुलीच्या घरातील मंडळी एकत्रित जमली. तेव्हा मुलीने तिच्या पालकांसोबत घरी जाण्यास नकार दिला. त्यामुळे मुलीच्या घरातले नाराज होत ते हरियाणात परत निघून गेले.(सरकारी नोकरीबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती व्हायरल, नागरिकांना सावधानतेचा इशारा)

अखेर लग्न करण्यावर गोष्ट पोहचली खरी. पण मुलगी ही 21 वर्षाची असून मुलाचे वय 19 वर्ष आहे. परंतु लग्नासाठी मुलाचे वय 21 वर्ष आणि मुलीचे वय 18 वर्ष असावे. पण या प्रकरणात मुलाचे वय कमी असल्याने कायद्यानुसार लग्न होऊ शकत नाही.तर मुलगी ही 21 वर्षाची असल्याने तिला स्वत:चे निर्णय घेण्यास स्वातंत्र्य आहे. तसेच मुलगा 19 वर्षाचा असल्याने त्याने लग्न केलेले नाही. यासाठी पोलीस या प्रकरणी कोणतीही कार्यवाही करु शकत नाही.