Kolhapur Shocker: पतीचं निधन आणि गतिमंद दत्तक मुलीच्या निराशेतून मायलेकींंची आत्महत्या
Suicide | Representational Image (Photo Credits: Pixabay)

कोल्हापूर (Kolhapur) मध्ये एका मायलेकीने आपलं आयुष्य आत्महत्या करून संपवल्याची मन विषण्ण करणारी घटना घडली आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार आत्महत्या करणार्‍या चिमुकली चं वय अवघं 7 वर्षांचं होतं. कोल्हापूर मध्ये वारणा नदीमध्ये (Warna River) उडी मारून या मायलेकींनी आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या प्राथमिक तपासामध्ये उघड झालेल्या माहितीमध्ये मुलगी गतिमंद असल्याने नैराश्येमधून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं असे सांगितले जात आहे.

कोल्हापूर मध्ये कोडोली- चिकुर्डे धरण पुलावरून या मायलेकींनी नदीमध्ये उडी मारली. रेश्मा अमोल पारगावकर असं आईचं नाव असून त्या नर्स होत्या. दोन वर्षांपूर्वी पतीचं निधन झाल्यानंतर 6 वर्षांपूर्वीच त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली होती. दत्तक घेतना ही अवघी 4 महिन्यांची होती. दरम्यान ही मुलगी गतिमंद असल्याचं काही महिन्यांनी निष्पन्न झाले. रेश्माचे पती अपघाती निधनात गेले त्याचं दु:ख आणि गतिमंद मुलगी यामुळे निराश झालेल्या रेश्माने आत्महत्येसार्खं टोकाचं पाऊल उचललं. मंगळवारी त्यांनी नदीत उडी मारून आयुष्य संपवलं. दरम्यान या वृत्तानंतर आजूबाजूच्या गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. (नक्की वाचा: Police Constable Dies By Suicide: मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची गळफास लावून आत्महत्या, तपास सुरू).

रेश्मा दिवसा आत्महत्या करण्यासाठी जेव्हा नदीवर आली होती तेव्हा तेथील काही लोकांनी तिची समजूत काढून तिला घरी पाठवलं. नंतर रात्री पुन्हा रेश्मा नदीवर आली आणि उडी मारली. या मायलेकींचा मृतदेह ऐतवडे खुर्द येथे सापडला आहे.