गेल्या काही तासांपासून हार्बर रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. मानससरोवर स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने वाहतूकीवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे येणाऱ्या आणि सीएसएमटीकडून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या एकाच जागी थांबल्या आहेत.
उशिरा धावणाऱ्या लोकल्स यामुळे सकाळी कामावर निघालेल्या नोकरदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे स्थानकात घोषणा करुन तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती देण्यात आली. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचे काम रेल्वे प्रशासन करत आहे. मात्र लोकल येत नसल्याने प्रवाशांच्या गर्दीत वाढ होत आहे. रेल्वेसेवा सुरळीत होण्याची कोणतही ठोस माहीती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेली नाही.
रेल्वे बंद असल्याने बससेवेने प्रवास करण्याचा पर्याय प्रवासी निवडत आहेत. त्यामुळे हायवेवर प्रवाशांची गर्दी वाढताना दिसत आहे.