महाराष्ट्रात (Maharashtra) दिवसेंदिवस कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यामुळे महाराष्ट्रात सर्वसामन्यांपासून ते मोठे उद्योजक राज्य सरकारला आर्थिक मदतीसाठी हातभार लावण्याच्या प्रयत्न करत आहेत. यातच कोरोना विषाणूच्या संकटकाळात रमजान ईद दिवशी मुस्लिम समाजाने( Muslim Community) अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. तसेच मुस्लिम समाजाने दिलेल्या देणगीतून इचलकरंजी (Ichalkaranji) येथील इंदिरा गांधी रुग्णालयात (Indira Gandhi General Hospital) 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुस्लिम बांधवांचे कौतून केले आहे.
कोरोना च्या संकटकाळात पवित्र रमजानईद दिवशी मुस्लिम समाजाने अतिदक्षता विभाग सुरु करण्यासाठी दिलेले योगदान अतुलनीय आहे. जात, पात, धर्माच्या पलिकडे जाऊन कोरोनाच्या उच्चाटनासाठी एकजुटीने लढा देण्यासाठी इचलकरंजीतील हे योगदान आदर्शवत आहे, असेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले आहेत. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची सुमारे 36 लाख रुपयांची रक्कम उपयोगात आणली आहे. या रकमेतून 10 बेडचा अतिदक्षता विभाग सुरु करण्यात आले, अशीही माहिती राज्य सरकारच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. हे देखील वाचा- उत्तर प्रदेशातील मजुरांना आईने सांभाळलं नाही म्हणून मावशीकडे यावं लागलं; बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लगावला टोला (Watch Video)
ट्वीट-
#COVID_19 च्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने ईदमधील अनावश्यक खर्चाला फाटा देत रमजानच्या पवित्र महिन्यातील जकात, सदका आणि इमदादची सुमारे ३६ लाख रुपयांची रक्कम #WarAgainstVirus साठी आणली उपयोगात. या रकमेतून १० बेडचा अतिदक्षता विभाग सुरु. pic.twitter.com/L7s1A98AG2
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 25, 2020
इचलकरंजीमधील मुस्लिम समाजाच्या देणगीतून इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या अतिदक्षता विभागाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले ऑनलाईन लोकार्पण केले आहे. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील याडरावकर देखील उपस्थित होते.